AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोलकाता नाईट रायडर्सची वाईट स्थिती पाहून अनिल कुंबळे भडकला, अशा शब्दात सुनावलं

गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स संघाची यंदाच्या स्पर्धेत वाईट स्थिती आहे. प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाद झाला आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या कामगिरीने माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे संतापला आहे. तसेच त्याने काय चुका झाल्या ते सांगितलं आहे.

कोलकाता नाईट रायडर्सची वाईट स्थिती पाहून अनिल कुंबळे भडकला, अशा शब्दात सुनावलं
अजिंक्य रहाणे आणि अनिल कुंबळेImage Credit source: PTI
| Updated on: Apr 25, 2025 | 5:28 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेत गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाची स्थिती नाजूक आहे. मागच्या वर्षी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात जेतेपद मिळवलं होतं. मात्र यंदाच्या स्पर्धेत विजयाचा ट्रॅक कायम राखणं काही जमलं नाही. काही हातातले सामने गमावले आहेत. त्यामुळे प्लेऑफमध्ये स्थान मिळवणं आता खूपच कठीण झालं आहे. कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत खेळलेल्या आठपैकी 3 सामन्यात विजय मिळला आहे. तसेच 5 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. गुणतालिकेत कोलकाता नाईट रायडर्स संघ सातव्या स्थानावर आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाला लय सापडेल असं वाटलं होतं. पण संघ पूर्णपणे विस्कटल्याचं दिसत आहे. त्यामुळे कर्णधार अजिंक्य रहाणेवर बोट दाखवलं जात आहे. कोलकात्याची स्पर्धेतील अशी स्थिती पाहून माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कुंबळेने सांगितलं की, आंद्रे रसेलचा वापर योग्य पद्धतीने केला गेला नाही.

अनिल कुंबळेने जियो हॉटस्टारशी बोलताना सांगितलं की, ‘मला वाटते की केकेआरने आंद्रे रसेलचा वापर योग्य पद्धतीने केला नाही. रसेला फलंदाजीसाठी वर पाठवलं पाहीजे होतं. त्याला जास्तीत जास्त संधी द्यायला हवी होती. पंजाबविरुद्ध जो सामना हारले, त्यात तसंच झालं. त्यावेळी डगआऊटमधून हा निर्णय घ्यायला हवा होता की, रसेल आता तू जा आणि सामना संपवून येण्याचा प्रयत्न कर. जर पहिल्या चेंडूवर बाद झाला तरी काही चिंता नाही. आपल्याकडे आणखी फलंदाज आहेत.’

‘पण तसं काही झालं नाही. जेव्हा रसेल फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याला गोलंदाजांसोबत खेळावं लागलं. मागच्या सामन्यात जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा सामना जवळपा संपला होता. तेव्हा 17 किंवा त्यापेक्षा अधिक धावा प्रति षटक हव्या होत्या. असं कदाचित 10 किंवा 20 सामन्यात एकदाच होऊ शकतं. वारंवार नाही. यासाठी मला असं वाटतं की केकेआरने याबाबत विचार करावा आणि यातून मार्ग काढावा.’, असंही अनिल कुंबळे पुढे म्हणाला. कोलकाता नाईट रायडर्सचा पुढचा सामना पंजाब किंग्सविरुद्द 26 एप्रिलला होणार आहे. आतापर्यंत केलेल्या चुकांमधून काही धडा घेणार का? हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा