AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असं कसं केलं सिलेक्शन..! 7 सामन्यात फक्त 1 विकेट आणि दुखापतीने त्रस्त, तरी संघात निवड झाल्याने आश्चर्य

अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात बरेच बदल पाहायला मिळत आहे. असं असताना संघात एका खेळाडूची झालेली निवड क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का देणारी आहे. ही निवड कोणत्या आधारावर झाली? असा प्रश्नही विचारला जात आहे.

असं कसं केलं सिलेक्शन..! 7 सामन्यात फक्त 1 विकेट आणि दुखापतीने त्रस्त, तरी संघात निवड झाल्याने आश्चर्य
असं कसं केलं सिलेक्शन..! 7 सामन्यात फक्त 1 विकेट आणि दुखापतीने त्रस्त, तरी संघात निवड झाल्याने आश्चर्यImage Credit source: Getty Images
| Updated on: Sep 01, 2026 | 8:01 PM
Share

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून चार जखमी खेळाडूंना संधी दिली गेली आहे. या मालिकेपूर्वी त्याच्या दुखापतीत काही सुधारणा झाली नाही तर दुसऱ्या खेळाडूचा विचार केला जाईल. या भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे. या मालिकेपूर्वी हे चारही खेळाडू फिट होतील की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे फिट अँड फाईन असलेल्या खेळाडूंना संधी का दिली नाही? असा प्रश्नही आहे. खरं तर कृणाल पांड्या गेल्या पाच वर्षांपासून भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याची आयपीएल स्पर्धेतील कामगिरीही चांगली राहिली आहे. पण त्याला संघात काही स्थान मिळालेलं नाही. दुसरीकडे, वॉशिंग्टन सुंदरच्या निवडीवरून वादाला फोडणी मिळाली आहे.

वॉशिंग्टन सुंदर निवड आणि कृणाल पांड्यावर अन्याय!

कृणाल पांड्या गेल्या दोन वर्षांपासून टी20 क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. आयपीएलच्या दोन पर्वात आरसीबीच्या विजयात त्याचा मोलाचा वाटा राहिला आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत त्याची अष्टपैलू कामगिरी चर्चेत राहिली. त्याने 37.66 च्या सरासरीने 266 धावा केल्या. यासह 14 विकेटही घेतल्या होत्या. असं असूनही त्याला डावललं गेलं. इतकंच काय तर वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त असूनही त्याची निवड केली आहे. त्याचा बॉलिंगचा फॉर्मही काही खास नाही. त्यामुळे टीका होणं सहाजिकच आहे. पूर्ण फिट असताना निवड झाली असती तर समजू शकलो असतो. पण त्याचा निवडीचा निर्णय कोणत्या आधारावर घेतला? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.

मागच्या सात सामन्यात सुमार कामगिरी

वॉशिंग्टन सुंदरने मागच्या सात आंतरराष्ट्रीय सामन्यात निराशाजनक कामगिरी केली आह. त्याला फक्त एकच विकेट घेण्यात यश आलं आहे. वॉशिंग्टन सुंदरला शेवटची विकेट 17 जून 2026 रोजी अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात मिळाली होती. तर फलंदाजीतही काही खास योगदान देऊ शकला नाही. त्याने मागच्या पाच डावात तीन वेळा एकेरी धावसंख्येवर बाद झाला. तर एकही अर्धशतक ठोकू शकलेला नाही. असं असूनही त्याची संघात निवड झाल्याने क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?