Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाची जागा गेली, हा ऑलराऊंडर भरुन काढणार त्याची उणीव
भारतीय संघासाठी अनेक वेळा चांगली कामगिरी करणाऱ्या रवींद्र जडेजाला श्रीलंके विरुद्ध भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. गेल्या काही सामन्यांमध्ये त्याने कोणतीही उत्कृष्ठ कामगिरी केलेले नाही. त्यामुळे त्याच्या जागी आता नव्या खेळाडूंना संधी दिली जाणार आहे. कोण आहेत ते खेळाडू जाणून घ्या.

टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी सोमवारी रवाना होणार आहे. त्याआधी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. पण या सिरीजमध्ये रवींद्र जडेजाला संधी मिळालेली नाही. त्यामुळे आता जडेजा भारताच्या एकदिवसीय संघाचा भाग नाहीये. त्याआधी त्याने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषणा केली होती. टीम इंडियाची कमान आता गौतम गंभीर यांच्या हातात आली आहे. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक असलेल्या गंभीर यांनी त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली आहे. गंभीरला या खेळाडूत पुढचे भविष्य दिसत आहे. सुंदरला श्रीलंका दौऱ्यात स्थान मिळालं आहे. भारत-श्रीलंका वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार आहेत. पण जडेजाचा पत्ता कट झाला आहे.
जडेजा फॉर्मात नाही
जडेजाने नोव्हेंबर २०२३ मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा वनडे सामना खेळलाय. भारतीय संघासाठी त्याने अनेक सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. पण नंतर त्याची कामगिरी खराब ठरत आहे. त्यामुळे जडेजाच्या जागी आता युवा खेळाडूला संघात स्थान मिळू शकते. भारतीय संघ आतापासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि त्यानंतर होणाऱ्या टी२० वर्ल्डकपच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे जडेजाला टीम इंडियातून वगळण्यात आले आहे.
शेवटच्या सामन्यांमध्ये वाईट कामगिरी
जडेजाने 2024 च्या T20 विश्वचषक आणि एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघात कोणतीही विशेष अशी कामगिरी केलेली नाही. त्यामुळे त्याचं क्रिकेट आता संपलं अशा चर्चा सुरु होत्या. त्याने खेळलेले शेवटचे 9 सामन्यांमध्ये ही त्याला काही विशेष कामगिरी करता आलेली नव्हती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 धावा करून जडेजा बाद झाला होता. त्याला एकही विकेट घेता आली नव्हती. इतर संघाच्या विरुद्ध ही तो लवकर आऊट झाला होता.
नव्या खेळाडूंना संधी
टीम इंडिया आणि बीसीसीआय आत्या सुंदरला वनडे संघात त्याच्या जागी पाहत आहे. तो देखील एक उत्कृष्ठ अष्टपैलू खेळाडू आहे. वॉशिंग्टन सुंदर याने भारतासाठी १९ वनडे सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 18 विकेट ही घेतल्या आहेत. 11 डावात त्याने 265 धावा केल्या आहेत. सुंदरसोबत अक्षर पटेललाही श्रीलंका दौऱ्यात संधी मिळाली आहे. अक्षर हा अनुभवी खेळाडू असून तो फॉर्मातही आहे. पण अनेक दिवस जडेजा खेळत असल्याने अक्षर पटेल याला संघात जास्त संधी मिळाली नाही. पण टी२० वर्ल्डकपमध्ये त्याला संधी देण्यात आली. त्याने चांगली कामगिरी करुन दाखवली.
