AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WCL Semi Final 2: इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 86 धावांनी विजय, फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध भिडणार

WCL 2024 Pakistan Champions vs India Champions Final: युवराज सिंह याच्या नेतृत्वात इंडिया चॅम्पियन्सने ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सवर 86 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.

WCL Semi Final 2: इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 86 धावांनी विजय, फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध भिडणार
India Champions
| Updated on: Jul 13, 2024 | 1:40 AM
Share

डब्ल्यूसीएल 2024 स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये इंडियाने ऑस्ट्रेलियावर 86 धावांनी विजय मिळवला आहे. इंडियाने या विजयासह फायनलमध्ये धडक मारली आहे. इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 255 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं होतं. या विजयी धावांचा पाठलाग करताना कांगारुंना 7 विकेट्स गमावून 168 धावाच करता आल्या. इंडियाने अशाप्रकारे हा सामना जिंकला. आता शनिवारी 13 जुलै रोजी इंडिया विरुद्ध पाकिस्तान असा महामुकाबला होणार आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग

टीम पेन याचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाच्या एकालाही टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर फार वेळ तग धरता आला नाही. टीम पेनने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. नॅथन कुल्टर नाईल 30 धावा करुन माघारी परतला. कॅलम फर्ग्युसन याने 23 धावांचं योगदान दिलं. डॅनियल ख्रिश्चनने 18, एरॉन फिंच 16, बेन कटिंगने 11 आणि बेन डंकने 10 धावा केल्या. तर इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. इंडियाकडून धवल कुलकर्णी आणि पवन नेगी या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर हरभजन सिंह, इरफान पठाण आणि राहुल शुक्ला या तिघांनी 1-1 विकेट घेतली.

इंडियाची बॅटिंग

दरम्यान त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. इंडियाने चौघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 254 धावा ठोकल्या. इंडियाकडून ओपनर रॉबिन उथप्पा याने सर्वाधिक 65 रन्स केल्या. त्यानंतर कॅप्टनने मिडल ऑर्डरमध्ये विस्फोटक बॅटिंग केली. युवराजने 28 चेंडूत 59 रन्स केल्या. तर अखेरीस युसूफ आणि इरफान या पठाण बंधूंनी तोडफोड खेळी केली. इरफानने 50 आणि युसूफने नाबाद 59 धावांची खेळी करत इंडियाला 250 पार पोहचवण्यात मोठी भूमिका बजावली. ऑस्ट्रेलियासाठी पीटर सीडलने 4 विकेट्स घेतल्या. तर झेव्हियर्स डॉहर्टी आणि कुल्टर नाईल या दोघांना 1-1 विकेट मिळाली.

इंडिया चॅम्पियन्स प्लेइंग ईलेव्हन: युवराज सिंग (कॅप्टन), रॉबिन उथप्पा (विकेटकीपर), गुरकीरत सिंग मान, सुरेश रैना, अंबाती रायडू, युसूफ पठाण, इरफान पठाण, पवन नेगी, विनय कुमार, हरभजन सिंग आणि धवल कुलकर्णी.

ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स प्लेइंग ईलेव्हन : ब्रेट ली (कॅप्टन), आरोन फिंच, कॅलम फर्ग्युसन, बेन कटिंग, डॅनियल ख्रिश्चन, टिम पेन (विकेटकीपर), बेन डंक, बेन लॉफलिन, पीटर सिडल, झेवियर डोहर्टी आणि नॅथन कुल्टर-नाईल.

महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक.