AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पठाण बंधुची भर मैदानातच तू तू मैं मैं, धाव घेताना झालं असं की…

वर्ल्ड चॅम्पियनशिप लीजेंड्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना भारताने 54 धावांनी गमावला. पण तरीही नेट रनरेटच्या जोरावर टीम इंडियाने आपली जागा उपांत्य फेरीत केली आहे. असं असताना या सामन्यात पठाण बंधूंची तू तू मैं मैं पाहायला मिळाली. धाव घेताना या दोघांमध्ये विसंवाद झाला आणि मग पारा चढला.

Video : दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पठाण बंधुची भर मैदानातच तू तू मैं मैं, धाव घेताना झालं असं की...
Image Credit source: video grab
| Updated on: Jul 11, 2024 | 6:45 PM
Share

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने आपली जागा पक्की केली आहे. उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. 12 जुलैला रात्री 9 वाजता हा सामना होणार आहे. तत्पूर्वी साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात भारत आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना खऱ्या अर्थाने दोन्ही संघांसाठी करो या मरोची लढाई होती. दक्षिण अफ्रिकेला विजय खूपच महत्वाचा होता. विजय मिळाला खरा पण नेट रनरेटचं गणित चुकलं. दक्षिण अफ्रिकेने 20 षटकात 210 धावा केल्या आणि विजयासाठी 211 धावांचं आव्हान दिलं. पण या धावांचा पाठलाग करणं काही टीम इंडियाला जमलं नाही. भारतीय संघाने 20 षटकात 6 गडी गमवून 156 धावा केल्या. दरम्यान, धावांचा पाठलाग करताना पठाण बंधूंमध्ये जुंपल्याचं चित्र पाहायला मिळालं. या व्हिडीओत पठाण बंधू एकमेकांवर राग काढत असल्याचं दिसत आहे.

इरफान पठाण आणि युसूफ पठाण हे दोघं फलंदाजी करत होतं. दक्षिण अफ्रिकेकडून 18वं षटक टाकण्यासाठी डेल स्टेन आला होता. त्याने टाकलेल्या चेंडूवर इरफानने डीप कव्हरला फटका मारला. दोन्ही भावांनी यावर सोपी धाव घेतली आणि दुसऱ्या धावेसाठी इरफान सज्ज झाला. पण युसूफ पठाण चेंडूकडे पाहात होता. तसेच नुसता हात दाखवून इरफान दुसरी धाव नको असा इशारा केला. पण तिथपर्यंत इरफान पठाणने धाव घेत मध्य गाठला होता. त्याचा कॉल पाहून इरफान क्रिझमध्ये परतण्यासाठी धडपड करू लागला. पण तिथपर्यंत डेल स्टेनच्या हातात चेंडू आला होता आणि धावचीत व्हावं लागलं.

रनआऊट झाल्यानंतर इरफान पठाण संतापला आणि युसूफ पठाणवर राग काढला. चेंडूकडे काय पाहतो असा इशारा केला. त्यावर युसूफ पठाणनेही प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरं तर या दोघा बंधूंमध्ये खूपच जिव्हाळ्याचं नातं आहे. पण खेळात एक अशी वेळ येते की संयम सुटतो. असाच एक प्रसंग आयपीएलमध्ये घडला होता. जेव्हा युसूफ पठाणचा झेल इरफानने पकडला होता. मात्र सेलीब्रेशन केलं नव्हतं.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.