ENG vs IND : टीम इंडियाने फायनलमध्ये टॉस जिंकला, इंग्लंड विरुद्ध बॅटिंग, मालिका जिंकण्यासाठी किती धावांचं आव्हान पुरेसं?
England Women vs India Women 3rd ODI Toss : भारत आणि इंग्लंड दोन्ही संघांनी 3 सामन्यांच्या मालिकेत प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे.त्यामुळे तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात दोन्ही संघात चांगलीच चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

शुबमन गिल याच्या नेतृत्वात मेन्स टीम इंडिया 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स टीम इंडिया टी 20I नंतर आता एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी सज्ज आहे. हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वूमन्स टीम इंडिया 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांकडे मालिका जिंकण्याची बरोबरीची संधी आहे. उभयसंघातील तिसऱ्या आणि अंतिम सामन्याचं आयोजन हे आज 22 जुलै रोजी रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ले-स्ट्रीट येथे करण्यात आला आहे.
उभयसंघातील तिसऱ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 5 वाजता टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार हरमनप्रीत कौर हीने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी भारताचा इंग्लंडसमोर जास्तीत जास्त धावांचा आव्हान ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे.
भारताने मालिकेत विजयी सलामी देत 1-0 ने आघाडी घेतली होती. त्यानतंर पावसामुळे दुसरा सामना 50 षटकांचा होऊ शकला नाही.तसेच भारतीय फलंदाजांनीही निराशा केली. भारताला 29 ओव्हरमध्ये 150 धावांचा टप्पाही पार करता आला नाही. त्यानंतर दुसऱ्या डावात पावसाने व्यत्यय आणल्याने इंग्लंडला सुधारित आव्हान मिळालं. इंग्लंडने हे आव्हान सहज पूर्ण करत मालिकेत बरोबरी साधली.
भारतीय फलंदाज धावांचा डोंगर उभारणार?
त्यानंतर आता निर्णायक सामन्यात टीम इंडिया टॉसचा बॉल ठरला. त्यामुळे भारतीय संघाचा इंग्लंडसमोर धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न असणार आहे. आता या प्रयत्नात भारतीय फलंदाज किती यशस्वी होतात? हे पहिल्या डावानंतरच स्पष्ट होईल.
भारताने टॉस जिंकला
🚨 Toss Update 🚨#TeamIndia win the toss and elect to bat in the 3rd and Final ODI
Updates ▶️ https://t.co/8sa2H23CMd#ENGvIND pic.twitter.com/2FTJHFlPUS
— BCCI Women (@BCCIWomen) July 22, 2025
इंग्लंड वूमन प्लेइंग ईलेव्हन : टॅमी ब्यूमोंट, एमी जोन्स (विकेटकीपर), एम्मा लॅम्ब, नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), सोफिया डंकले, अॅलिस डेव्हिडसन रिचर्ड्स, चार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन, लिन्सी स्मिथ, लॉरेन फाइलर आणि लॉरेन बेल.
टीम इंडिया वूमन प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मंधाना, प्रतीका रावल, हर्लीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, राधा यादव, स्नेह राणा, श्री चरणी आणि क्रांती गौड.
