AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Retirement : मॅचविनर ऑलराउंडरकडून निवृत्तीची घोषणा, 2 सामन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार

International Cricket Retierment : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केला आहे. या दरम्यान स्टार ऑलराउंडरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

Retirement : मॅचविनर ऑलराउंडरकडून निवृत्तीची घोषणा, 2 सामन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार
Hardik Pandya and Andre RussellImage Credit source: Getty Images
| Updated on: Jul 17, 2025 | 12:42 AM
Share

क्रिकेट विश्वात सध्या कसोटी मालिकेचा थरार पाहायला मिळत आहे. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडिया 5 सामन्यांच्या मालिकेत 1-2 अशा फरकाने पिछाडीवर आहे. तर उभयसंघातील चौथा सामना हा 23 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला वेस्ट इंडिजला मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका गमावण्याची वेळ आली. ऑस्ट्रेलियाने विंडीजला कसोटी मालिकेत 3-0 ने व्हाईटवॉश केलं. त्यानंतर आता विंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 टी 20i सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.

विंडीज क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या मालिकेतून विंडीजचा स्टार ऑलराउंडर आंद्रे रसेल याचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मात्र रसेलने या मालिकेदरम्यान निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका लागला आहे.

आंद्रे रसेल निवृत्त होणार

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्ट्सनुसार, आंद्रे रसेल सबीना पार्कमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टी 20I सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. रसेल 2019 पासून विंडीजसाठी फक्त टी 20 फॉर्मेटमध्ये खेळत आहे. रसेलने विंडीजचं 84 टी 20I सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. भारत आणि श्रीलंकेत 2026 मध्ये टी 20I वर्ल्ड कप होणार आहे. त्याआधी रसेलने निवृत्तीचा निर्णय घेतल्याने चाहत्यांसह क्रिकेट बोर्डासाठी हा मोठा झटका आहे.

रिपोर्ट्सनुसार, रसेलला आगामी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत खेळायचं होतं. मात्र रसेलने फ्रँचायजी क्रिकेटकडे लक्ष केंद्रीत करायचं ठरवल्याने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. रसेल विंडीजच्या 2 टी 20I वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग राहिला आहे. विंडीजने 2012 आणि 2016 साली टी 20I वर्ल्ड कप जिंकला होता.

रसेलने विंडीजचं आतापर्यंत 1 कसोटी, 56 एकदिवसीय आणि 84 टी 20I सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. रसेलने टेस्टमध्ये 2 धावा करण्यासह 1 विकेट घेतली आहे. रसेलने एकदिवसीय कारकीर्दीत 1 हजार 34 धावा केल्या आहेत. तसेच 70 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. तसेच रसेलने टी 20I क्रिकेटमध्ये 1 हजार 78 धावा कुटण्यासह 61 विकेट्स मिळवल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी वेस्टइंडिज टीम : शाई होप (कर्णधार), ज्वेल एंड्रयू, जेडिया ब्लेड्स, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, अकील हुसैन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, गुडाकेश मोती, रोवमॅन पॉवेल, आंद्रे रसेल, शेरफेन रूदरफोर्ड आणि रोमारियो शेफर्ड.

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.