सेंट लुशिया : वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलला टी-20 क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. टी-20 प्रकारातील अनेक रेकॉर्ड आपल्या नावे करणाऱ्या गेलने आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसर्या टी-20 सामन्यात गेलने 38 चेंडूत 67 धावा ठोकत एक नवा इतिहास रचला. या 67 धावांसोबतच त्याने टी-20 क्रिकटमध्ये तब्बल 14 हजार धावांचा टप्पा पार केला. विशेष म्हणजे षटकार ठोकत त्याने हा टप्पा गाठला. ही कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. (West Indies Cricketer Chris Gayle became the first batsman in the history to score 14000 runs in T20 Cricket)
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (13 जुलै) पार पडला. वेस्ट इंडिज संघाने पहिल्या दोन्ही टी-20 सामन्यांप्रमाणे या सामन्यातही दिमाखदार विजय मिळवला. 6 विकेट्सने मिळवलेल्या या विजयात महत्त्वाचा वाटा ठरला ख्रिस गेलचा. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 142 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजकडून गेलने एकहाती सात षटकार आणि चार चौकार लगावत 67 धावा ठोकल्या. ज्यामुळे वेस्ट इंडिज संघाने सहज टार्गेट पूर्ण करत 6 विकेट्सने दमदार विजय मिळवला. दरम्यान या सामन्यापूर्वी गेलच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 13 हजार 971 धावा होत्या. त्यामुळे ६७ धावांमुळे गेलने 14 हजार धावा पूर्ण करत नवा रेकॉर्ड रचला.
5 सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडीज संघाने पहिले 3 सामने जिंकत मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली घेतली आहे. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या ओबेद मॅकॉय याने घेतलेल्या शानदार 4 विकेट्समुळे ऑस्ट्रेलिया संघ अवघ्या 127 धावांत सर्वबाद झाला आणि वेस्ट इंडिजने 18 धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यातही वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत 196 धावा केल्या. ज्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 140 धावाच करु शकल्याने वेस्ट इंडिजचा संघ 56 धावांनी विजयी झाला. त्यानंतर आता तिसऱ्या सामन्यातही 6 विकेट्सने विजय मिळवलेला वेस्ट इंडिज संघ चौथा आणि पाचवा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाला व्हाईट वॉश देण्याच्या तयाकरीत आहे.
हे ही वाचा :
India W vs England W, 3rd T20 live streaming: भारत विरुद्ध इंग्लंड, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?
(West Indies Cricketer Chris Gayle became the first batsman in the history to score 14000 runs in T20 Cricket)