World cup जिंकवणाऱ्या ‘या’ खेळाडूवर बंदी, 4 गुन्ह्यांची मिळाली शिक्षा

World cup | वेस्ट इंडिजच्या ज्या खेळाडूने T20 वर्ल्ड कप जिंकवायला मदत केली होती, त्यावर आता बंदी घालण्यात आली आहे. वेस्ट इंडिजच्या या दिग्गज क्रिकेटपटूवर ECB ने बंदीची कारवाई केली आहे. या दरम्यान तो क्रिकेटच्या कुठल्याही फॉर्मेटमध्य नाही खेळू शकतं.

World cup जिंकवणाऱ्या 'या' खेळाडूवर बंदी, 4 गुन्ह्यांची मिळाली शिक्षा
world cup trophy
Follow us
| Updated on: Nov 23, 2023 | 1:27 PM

नवी दिल्ली : वर्ल्ड कप 2023 ऑस्ट्रेलियाच्या विजायसह संपला. पण ज्या खेळाडूने वेस्ट इंडिजला 2016 मध्ये चॅम्पियन बनवलं होतं, त्यावर बंदी घालण्यात आली आहे. आम्ही बोलतोय मार्लन सॅमुएल्सबद्दल. भारतात 2016 साली T20 वर्ल्ड कप झाला. त्यावेळी मार्लन सॅमुएल्स वेस्ट इंडिजच्या विजयाचा मुख्य नायक ठरला होता. सॅमुएल्सवर आता बंदी घालण्यात आली आहे. त्याच्यावर ECB म्हणजे अमीरात क्रिकेट बोर्डाने ही बंदी घातली आहे. सॅमुएल्सवर 6 वर्षांसाठी ही बंदी घालण्यात आली आहे.

आता प्रश्न हा निर्माण होतो की, अखेर मार्लन सॅमुएल्सचा गुन्हा काय आहे? ज्याची शिक्षा त्याला मिळतेय. सॅमुएल्सचा गुन्हा हा आहे की, त्याने क्रिकेटचा कायदा मोडलाय. क्रिकेटमधील करप्शनच्या आरोपावरुन वेस्ट इंडिजच्या मार्लन सॅमुएल्सवर ECB च्या एंटी करप्शन यूनिटने बंदी घातलीय. या बंदीनंतर मार्लन सॅमुएल्स पुढची 6 वर्ष क्रिकेटच्या कुठल्याही फॉर्मेटमध्ये खेळू शकत नाही.

किती प्रकरणात दोषी धरलं?

मार्लन सॅमुएल्सवर ICC ने सप्टेंबर 2021 मध्ये आरोप लावले होते. त्यात त्याला पुढच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात दोषी पकडण्यात आलं. दोषी ठरवल्यानंतर त्याला फक्त शिक्षा सुनावण बाकी राहिलं होतं. ती प्रक्रिया आता पूर्ण झाली. मार्लन सॅमुएल्सला 4 प्रकरणात दोषी धरण्यात आलं. आचार संहिता 2.4.2, 2.4.3, 2.4.6 आणि 2.4.7 नियमांचा हे उल्लंघन आहे.

भारतात त्याने काय उद्धटपणा केलेला?

2016 साली भारतात झालेला T20 वर्ल्ड कप वेस्ट इंडिजने जिंकला होता. मार्लन सॅमुएल्स या टीमचा भाग होता. त्यावेळी विजयाच्या नशेत त्याने प्रेस कॉन्फरन्सनमध्ये जी कृती केलेली, त्यावरुन मोठा वाद झाला होता. संपूर्ण प्रेस कॉन्फरन्समध्ये टेबलावर पाय ठेऊन बोलला होता. भारतात भारताला हरवल्यानंतर त्याचा हा उद्धटपणा पाहून प्रत्येकजण नाराज होता.

आंतरराष्ट्रीय करीअरमध्ये त्याचा रेकॉर्ड काय?

मार्लन सॅमुएल्सने त्याच्या आंतरराष्ट्रीय करियरमध्ये 71 टेस्ट, 207 वनडे आणि 67 T20 इंटरनॅशनल सामने खेळला. नोव्हेंबर 2020 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. मार्लन सॅमुएल्सने 11,134 धावा करण्याशिवाय 152 विकेट घेतले.

'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय...
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय....
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं.
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?.
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी.