WI vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूची अष्टपैलू खेळी, विंडीजवर रोमहर्षक विजय, 4 धावांनी सामन्यात विजय

पहिले तिन्ही टी-20 सामने गमावल्यामुळे मालिका ऑस्ट्रेलियाच्या हातातून आधीच निसटली होती. मात्र तरीही चौथ्या सामन्यात रोमहर्षक विजय मिळवत व्हाईट वॉश मिळवण्यापासून ऑस्ट्रेलिया संघ वाचला आहे.

WI vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूची अष्टपैलू खेळी, विंडीजवर रोमहर्षक विजय, 4 धावांनी सामन्यात विजय
मिशेल मार्श

सेंट लुशिया : वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया (WI vs AUS) यांच्यात सुरु असलेल्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत पहिले तीन सामने जिंकत वेस्ट इंडिज संघाने मालिका जिंकली आहे. मात्र चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने मिळवलेल्या रोमहर्षक विजयाने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. या सामन्याचा खरा हिरो ठरला ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्श (Mitchell Marsh). त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये धमाकेदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

सामन्यात पहिली फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया संघाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्सच्या बदल्यात 189 धावांचा दिलासादायक स्कोर उभा केला. ऑस्ट्रेलियाचे बहुतेक फलंदाज फ्लॉप ठरत असताना कर्णधार एरॉन फिंच आणि ऑलराउंडर मिशेल मार्श यांनी सामना सावरत संघाला एक चांगला स्कोर उभा करुन दिला. सलामीवीर मॅथ्यू वेड 5 धावांवर बाद झाला. त्यानंतर मार्श फलंदाजीला येताच त्याने तुफान फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. सोबत कर्णधार फिंचने साथ देत दोघांनीा दुसऱ्या विकेटसाठी 114 धावांची भागिदारी रचली. यामध्ये फिंचने 53 आणि मार्शने 75 धावा केल्या. त्यानंतर वेस्ट इंडिज संंघाला विजयासाठी 190 धावांची गरज होती.

वेस्ट इंडिजची धमाकेदार सुरुवात

190 धावांचे लक्ष्य पार करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिज संघाने जबरदस्त सुरुवात केली. सलामीवीर लेंडल सिमन्स आणि एवन लुईस यांनी 4.5 ओव्हरमध्ये 62 धावा ठोकल्या. पण लगेचच फिरकीपटू अॅडम झम्पा याने लुइसला बाद करत ही भागीदारी तोडली. त्यानंतर मात्र लेंडल याच्या 72 धावांशिवाय कोणत्याच फलंदाजा खास कामगिरी करता आली नाही.

दोन्ही मिशेल वेस्ट इंडिजवर भारी

आधी फलंदाजीने अप्रतिम प्रदर्शन करणाऱ्या मिशेल मार्श याने गोलंदाजीतही कमाल दाखवली. सर्वात आधी महत्त्वाचा फलंदाज ख्रिस गेलला अवघ्या एका रनावर बाद केल्यानंतर पुढे सामन्यात आणखी दोन विकेटही त्याने मिळवले. मार्शने 4 ओव्हरमध्ये 24 धावा देत 3 विकेट घेतले. ज्यानंतर फेबियन एलन आणि आंद्रे रस्सेल हे सामना ऑस्ट्रेलियाकडून खेचून आणतील असे वाटत होते. एलनने तर  19 व्या ओव्हरमध्ये तीन षटकारही ठोकले. अखेर शेवटच्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडीजला विजयासाठी 11 धावांची गरज होती. त्यावेळी रस्सेल फलंदाजीला असताना हा स्कोर सहज शक्य आहे असे वाटत होते. पण त्याचवेळी अनुभवी मिशेल स्टार्कने भेदक गोलंदाजी करत केवळ 6 रन दिले ज्यामुळे सामना 4 धावांनी ऑस्ट्रेलियाने खिशात घातला.

हे ही वाचा :

IND-W vs ENG-W: भारतीय संघावर ‘ही’ इंग्लंडची खेळाडू पडली भारी, दमदार फलंदाजी करत खेचून आणला विजय, सामन्यासह मालिकेतही भारताचा पराभव

भारतीय संघात कोरोनाची एन्ट्री, 2 खेळाडू पॉझिटिव्ह, इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेआधी चिंता वाढल्या!

(West Indies vs Australia 4th t20 Match Won by Australia with Mitchell Marsh All rounder game with 75 run and 3 wickets)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI