शुबमन गिलला टेस्ट कॅप्टन करण्याचं कारण काय? बीसीसीआयने पुढच्या दोन वर्षांचा असा आखला प्लान
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर कर्णधारपदी कोण? असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून विचारला जात होता. अखेर शुबमन गिलची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पण शुबमन गिलची नियुक्ती करण्याचं कारण काय? जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यासारखे दिग्गज असताना त्याच्याच नावावर शिक्कामोर्तब का? जाणून घ्या.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाने कात टाकली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये गिल पर्वाचा उदय झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कसोटी कर्णधारपदी कोण असेल? याची खलबतं सुरु होती. ऋषभ पंत, केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या नावांची चर्चा होती. इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी बीसीसीआयपुढे नव्या कर्णधाराची घोषणा करण्याचं मोठं आव्हान होते. पण बीसीसीआयने वरील सर्व नावांना डावलून 25 वर्षीय शुबमन गिलचा विचार केला. तसेच त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. त्याच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत शुबमन गिलच्या नेतृत्वाचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. शुबमन गिल हा टीम इंडियाचा 37वा कसोटी कर्णधार असणार आहे. ...