AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs RR : ‘अशा टॅलेंटचा काय फायदा?’ पराभवानंतर गावस्करांनी राजस्थानच्या ‘या’ खेळाडूला झापलं

SRH vs RR : IPL 2024 मध्ये काल क्वालिफायरचा दुसरा सामना झाला. या मॅचमध्ये सनराजयर्स हैदराबादने सरस खेळ दाखवत राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं. या पराभवामुळे राजस्थान रॉयल्सच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलय. या मॅचमध्ये सुनील गावस्कर यांनी राजस्थानच्या एका फलंदाजांवर परखड शब्दात टीका केली.

SRH vs RR : 'अशा टॅलेंटचा काय फायदा?' पराभवानंतर गावस्करांनी राजस्थानच्या 'या' खेळाडूला झापलं
Sunil Gavaskar Image Credit source: PTI
| Updated on: May 25, 2024 | 8:46 AM
Share

IPL 2024 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. या हारमुळे राजस्थान रॉयल्सला आपल्या दुसऱ्या जेतेपदासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. दोन वर्षांपूर्वी संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानची टीम फायनलमध्ये पोहोचली होती. पण हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सने त्यांना पराभूत केलं. IPL 2023 मध्ये थोडक्यात त्यांची प्लेऑफची संधी हुकली. काल महत्त्वाच्या सामन्यात राजस्थानची फलंदाजांची फळी कोसळली. दव पडला नाही. त्याचा शाहबाज अहमद आणि अभिषेक शर्मा या स्पिनर्सनी फायदा उचलला. या दोघांची गोलंदाजी खेळताना राजस्थान रॉयल्सचा डाव गडगडला. फॉर्ममध्ये असलेला रियान पराग लवकर बाद झाला. हा राजस्थानसाठी मोठा झटका होता.

SRH ने दिलेल्या 176 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना 8.3 ओव्हर्सनंतर राजस्थानची स्थिती 67-3 होती. शाहबाज आणि अभिषेकची गोलंदाजी सुरु झाल्यानंतर राजस्थानचा डाव आणखी अडचणीत सापडला. 22 चेंडूत राजस्थानला एक बाऊंड्री मारता आली नाही. त्यामुळे फलंदाजांवर दबाव वाढत गेला. रियान पराग 9 चेंडूत 6 धावांवर खेळत होता. त्याने शाहबाज अहमदच्या गोलंदाजीवर हल्ला चढवण्याचा निर्णय घेतला. शाहबाजने त्याआधी नऊ सामन्यात एकही विकेट घेतला नव्हता.

सुनील गावस्करांची परखड शब्दात टीका

शाहबाज 12 वी ओव्हर टाकत होता. त्याच्या पहिल्या चेंडूवर रियान परागने सिक्स मारण्याचा प्रयत्न केला. पण डीप मिडविकेटला अभिषेक शर्माने आरामात झेल घेतला. रियान पराग बाद झाल्यानंतर सुनील गावस्कर यांनी आपला संताप व्यक्त केला. राजस्थानच्या या युवा फलंदाजावर त्यांनी एकदम परखड शब्दात टीका केली.

सुनील गावस्कर काय बोलले?

“तुम्ही जर विचारच करणार नसाल, तर अशा टॅलेंटचा काय उपयोग? हा कुठल्या प्रकारचा शॉट होता?” गावस्कर ऑन एअर हे बोलले. त्यांच्या शब्दातून संताप व्यक्त झाला. “तुमच्याकडे टॅलेंट असेल, पण परिस्थितीनुसार खेळता येत नसेल, तर उपयोग होणार नाही. तुम्ही काही निर्धाव चेंडू खेळले म्हणून काय झालं?” अशा शब्दात सुनील गावस्करांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Follow Us
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?