AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup Rising Stars: भारत बांग्लादेश उपांत्य फेरीचा सामना कुठे आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या सर्वकाही

आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा सामने शुक्रवारी होणार आहेत. भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध, तर पाकिस्तानचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. हा सामना कधी आणि किता पाहता येणार ते जाणून घ्या.

Asia Cup Rising Stars: भारत बांग्लादेश उपांत्य फेरीचा सामना कुठे आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या सर्वकाही
भारत बांग्लादेश उपांत्य फेरीचा सामना कुठे आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या सर्वकाही Image Credit source: acc/asian cricket
| Updated on: Nov 20, 2025 | 9:24 PM
Share

आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. उपांत्य फेरीत भारत विरुद्ध बांग्लादेश आणि पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात लढती होणार आहे. या दोन सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत लढणार आहेत. हा सामना 21 नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारी होणार आहे. तर अंतिम सामना 23 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. त्यामुळे कोणते दोन संघ अंतिम फेरी गाठतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारत ए आणि बांगलादेश ए यांच्यातील पहिला उपांत्य फेरीचा सामना सामना शुक्रवार, भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल. नाणेफेक दुपारी 2.30 वाजता होईल. दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान ए आणि श्रीलंका ए यांच्यात रात्री 8 वाजता सुरू होईल. नाणेफेकीचा कौल 7.30 वाजता होईल. दोन्ही सामने दोहा येथील वेस्ट एंड पार्क येथे खेळले जातील.

तुम्ही थेट सामने आणि थेट प्रक्षेपण कुठे पाहू शकता?

सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे टीव्ही आणि मोबाइल एप्सवर आशिया कप रायझिंग स्टार्सचे प्रसारण करण्याचे अधिकार आहेत.सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने देखील थेट पाहू शकता. याव्यतिरिक्त उपांत्य फेरीच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्ह आणि फॅनकोड एप किंवा वेबसाइटवर पाहता येईल. जर तुम्ही टीव्हीवर सामना पाहत असाल तर तुम्ही तो सोनी स्पोर्ट्सवर पाहू शकाल.

कशी आहे सामन्याची खेळपट्टी?

आशिया कप रायझिंग स्टार्सचे सर्व सामने दोहा येथील वेस्ट एंड पार्क येथे खेळवले जात आहेत. उपांत्य आणि अंतिम फेरीचा सामनाही येथेच खेळला जाईल. या स्टेडियममधील खेळपट्टीवर आतापर्यंत दोन्ही बाजू दिसून आल्या आहेत. भारताने युएईविरुद्ध 297 धावा याच मैदानात केल्या होत्या. तर पाकिस्तानविरुद्ध 140 धावाही करता आल्या नव्हत्या. त्यामुळे या उपांत्य सामन्यात खेळपट्टी महत्त्वाची भूमिका बजावेल.

..तर अंतिम फेरीत भारत पाकिस्तान लढत

भारताने पहिला उपांत्य सामन्यात बांगलादेशला पराभूत केलं आणि दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला पराभूत केलं. तर अंतिम फेरीत भारत पाकिस्तान सामना पाहण्याची पर्वणी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. पण यासाठी दोन्ही संघांना उपांत्य फेरीत विजय मिळवावा लागणार आहे.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.