AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL : सर्वाधिक वेळा ऑरेंज कॅप जिंकणारे फलंदाज, विराट कोहली कितव्या स्थानी?

IPL Orange Cap Winners List: आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा ऑरेंज कॅप जिंकण्याची कामगिरी ही ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने केली आहे.

IPL : सर्वाधिक वेळा ऑरेंज कॅप जिंकणारे फलंदाज, विराट कोहली कितव्या स्थानी?
Ipl Virat Kohli RcbImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 24, 2026 | 8:30 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. या निमित्ताने या स्पर्धेच्या इतिहासात ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या फलंदाजांबाबत जाणून घेऊयात. आपल्या संघाला विजयी करण्यात प्रमुख योगदान देणाऱ्या खेळाडूला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात येतं. त्यानुसार आयपीएल स्पर्धेतील प्रत्येक मोसमाच्या शेवटी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप देण्यात येते. तसेच सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱ्या गोलंदाजाचा पर्पल कॅपने सन्मान करण्यात येतो. प्रत्येक मोसमात फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठी चढाओढ पाहायला मिळते. अशात 19 व्या मोसमाच्या निमित्ताने आपण आतापर्यंत या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.

आयपीएल स्पर्धेत 18 पैकी 9 मोसमात विदेशी फलंदाजांनी ऑरेंज कॅप आपल्या नावावर करण्यात यश मिळवलं आहे. तर 9 वेळा भारतीय फलंदाजांनी ही कॅप मिळवली आहे. स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा ऑरेंज कॅप जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डेव्हिड वॉर्नर याच्या नावावर आहे. वॉर्नर व्यतिरिक्त कोणत्या फलंदाजाने ही मानाची कॅप किती वेळा आपल्या नावावर केलीय? हे जाणून घेऊयात.

सर्वाधिक वेळा ऑरेंज कॅप जिंकणारे फलंदाज

डेव्हिड वॉर्नर याने स्पर्धेच्या इतिहासात तब्बल 3 वेळा ही ऑरेंज कॅप जिंकली आहे. यावरुन वॉर्नरने काय पद्धतीने बॅटिंग केली असेल याचा अंदाज येतो. वॉर्नरने 2015, 2017 आणि 2019 साली ऑरेंज कॅप पटकावली होती. विशेष म्हणजे वॉर्नरने सनरायजर्स हैदराबाद या एकाच टीमकडून खेळताना ही कामगिरी केली.

विराट गेलला पछाडत वॉर्नरची बरोबरी करणार?

तसेच विराट कोहली आणि ख्रिस गेल या फलंदाजांनी प्रत्येकी 2-2 वेळा ऑरेंज कॅप जिंकली आहे. विशेष म्हणजे दोघांनीही एकाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघाकडून ही कामगिरी केली आहे. डेव्हिड वॉर्नर आणि ख्रिस गेल हे दोघेही आयपीएलमधून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे यंदा विराटकडे सर्वाधिक धावा करुन गेलला मागे टाकण्यासह वॉर्नरच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.

ऑरेंज कॅपचे मानकरी, वर्ष आणि खेळाडू

  1. साई सुदर्शन, गुजरात टायटन्स, 2025
  2. विराट कोहली, आरसीबी, 2024
  3. शुबमन गिल, गुजरात टायटन्स, 2023
  4. जोस बटलर, राजस्थान रॉयल्स, 2022
  5. ऋतुराज गायकवाड, चेन्नई सुपर किंग्स, 2021
  6. केएल राहुल, पंजाब किंग्स, 2020
  7. डेव्हीड वॉर्नर, सनरायजर्स हैदराबाद, 2019
  8. केन विलियमसन, सनरायजर्स हैदराबाद, 2018
  9. डेव्हीड वॉर्नर, सनरायजर्स हैदराबाद, 2017
  10. विराट कोहली, आरसीबी, 2016
  11. डेव्हीड वॉर्नर, सनरायजर्स हैदराबाद, 2015
  12. रॉबिन उथप्पा, केकेआर, 2014
  13. मायकल हसी, सीएसके, 2013
  14. ख्रिस गेल, आरसीबी, 2012
  15. ख्रिस गेल, आरसीबी, 2011
  16. सचिन तेंडुलकर, मुंबई इंडियन्स, 2010
  17. मॅथ्यू हेडन, सीएसके, 2009
  18. शॉन मार्श, पंजाब किंग्स, 2008

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?