IPL 2026: वैभव सूर्यवंशीने कोणत्या गोलंदाजाला सर्वाधिक धुतलं? एकदा ही यादी वाचा

आयपीएल स्पर्धेत आता वैभव सूर्यवंशीच्या नावाची दहशत निर्माण झाली आहे. कारण वैभव अमुकतमूक गोलंदाजापुढे चालणार नाही हे सर्व अंदाज फोल ठरले आहे. वैभवने कोणत्याच गोलंदाजाला सोडलं नाही. पण या स्पर्धेत त्याने पाच दिग्गज गोलंदाजांना झोडलं.

IPL 2026: वैभव सूर्यवंशीने कोणत्या गोलंदाजाला सर्वाधिक धुतलं? एकदा ही यादी वाचा
| Updated on: May 28, 2026 | 5:56 PM

आयपीएल स्पर्धेत 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहता त्याला आता खऱ्या अर्थाने रन मशिन्स बोलण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत त्याने या स्पर्धेत 680 धावा केल्या आहेत. त्यापैकी 610 धावा या चौकार आणि षटकारने आल्या आहेत. आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने 65 षटकार मारले आहे. आजवरचा आयपीएल स्पर्धेतील हा मोठा विक्रम आहे. कारण आतापर्यंत इतके षटकार कोणत्याही फलंदाजाने मारले नाही. यात बहुतांश षटकार हे वैभव दिग्गज गोलंदाजांना मारले आहेत. चला जाणून घेऊयात या स्पर्धेत कोणत्या दिग्गज गोलंदाजांची धुलाई केली ती…

वैभव सूर्यवंशीने या गोलंदाजांची धुलाई केली

  • वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स सर्वाधिक धुलाई केली. त्याने पॅट कमिन्सच्या 16 चेंडूंचा सामना केला आणि 61 धावा ठोकल्या. त्यामुळे पॅट कमिन्सला वैभव सूर्यवंशीने दिवसा तारे दाखवले असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.
  • वैभव सूर्यवंशीच्या दुसरा गोलंदाज आला तो भुवनेश्वर कुमार.. खरं तर भुवनेश्वर कुमारच्या स्विंगचा सामना करताना भल्याभल्या फलंदाजांना जमत नाही. पण वैभवने त्यालाही सोडलं नाही. त्याने त्याच्या 19 चेंडूंचा सामना केला आणि 38 धावा ठोकल्या.
  • पंजाब किंग्सचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगही वैभव सिंगच्या रडारवर आला. त्याने त्याच्या 13 चेंडूंचा सामना केला आणि 36 धावा ठोकल्या. त्यामुळे अर्शदीप सिंगही वैभवच्या आक्रमणापुढे फेल गेला असंच म्हणावं लागेल.
  • गुजरात टायटन्सच्या मोहम्मद सिराजलाही त्याने आपल्या आक्रमक फलंदाजी तडाखा दिला. त्याने त्याच्या 10 चेंडूंचा सामना केला आणि 18 धावा काढल्या.
  • टीम इंडियाचा स्टार गोलंदाज आणि मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या जसप्रीत बुमराहलाही त्याने सोडलं नाही. त्याने त्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून आपलं म्हणणं खरं करून दाखवलं होतं. त्याने त्याच्या 5 चेंडूंचा सामना केला आणि 13 धावा काढल्या.

राजस्थान रॉयल्स संघ आता क्वॉलिफायर 2 फेरीत गुजरात टायटन्सचा सामना करणार आहे. या सामन्यात पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीचा आक्रमक बाणा पाहायला मिळणार यात काही शंका नाही. वैभव सूर्यवंशी या सामन्यात काय विक्रम रचतो आणि कोणच्या गोलंदाजाला धारेवर धरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us