AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहे अनुष्का शर्माची मैत्रीण, इंटरनेटवर होतेय व्हायरल? स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड करतो फॉलो

अभिनेत्री अनुष्का शर्माच्या या मैत्रिणीबद्दल अनेकांना जाणून घ्यायचं आहे. तिच्याविषयी नेटकऱ्यांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे. अनुष्काच्या मैत्रिणीला फॉलो करणाऱ्यांमध्ये विराट कोहलीचाही समावेश आहे. इतकंच नव्हे तर युजवेंद्र चहलसुद्धा तिला फॉलो करतो.

कोण आहे अनुष्का शर्माची मैत्रीण, इंटरनेटवर होतेय व्हायरल? स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड करतो फॉलो
अनुष्का शर्मा आणि तिची मैत्रीण मालविकाImage Credit source: Instagram
| Updated on: May 30, 2025 | 1:57 PM
Share

अभिनेत्री अनुष्का शर्माची एक मैत्रीण सध्या सोशल मीडिया सेन्सेशन ठरली आहे. अनुष्काची ही मैत्रीण कोण आहे, ती काय करते याबद्दल जाणून घेण्यासाठी नेटकरी फारच उत्सुक आहेत. इतकंच नव्हे तर तिला ओळखणाऱ्या लोकांच्या यादीत अनेक मोठी नावं आहेत. अर्थातच ती अनुष्काची मैत्रीण असल्याने विराट कोहली तिला सोशल मीडियावर फॉलो करतो. पण विराटशिवाय क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छाल, क्रिकेटर युजवेंद्र चहल हेसुद्धा तिचे फॉलोअर्स आहेत. महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षीचंही नाव फॉलोअर्सच्या यादीत आहे. त्यामुळे अनुष्काची ही मैत्रीण नेमकी आहे तरी कोण, याविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे.

अनुष्काच्या या मैत्रिणीचं नाव मालविका नायर आहे. ती रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या आयपीएलच्या क्वालिफायर सामनादरम्यान कॅमेरासमोर दिसली होती. जेव्हा आरसीबीने पंजाब किंग्जविरुद्ध क्लालिफायर 1 जिंकून आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा आनंद साजरा केला, तेव्हा मालविका नायरसुद्धा त्यात दिसली होती.

मालविका आणि अनुष्का या एकमेकांच्या जुन्या मैत्रिणी आहेत. फक्त क्लालिफायर 1 च्या सामन्यातच नाही तर त्याआधीही या दोघांना स्टेडियममध्ये एकत्र पाहिलं गेलं होतं. जेव्हा आरसीबी विरुद्ध एलएसजीचा सामना रंगला, तेव्हासुद्धा मालविका स्टेडियममध्ये उपस्थित होती. मालविकाच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, तिने मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशनमधून एमबीएची पदवी संपादित केली आहे. सध्या ती इनॉस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करते. मालविकाचं लग्न आरसीबीचे महसूल आणि विपणन प्रमुख (रेवेन्यू अँड मार्केटिंग हेड) निखिल सोसाले यांच्याशी झालंय. अनुष्का, विराट, मालविका आणि निखिल यांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. त्यामुळे या चौघांमध्ये खूप चांगली मैत्री असल्याचं स्पष्ट होतंय.

दरम्यान विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर अनुष्कासोबत तो वेळ घालवताना दिसून आला. या दोघांचा बॅडमिंटन खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अनुष्काने चित्रपटांमधून काही काळ ब्रेक घेतला आहे. तिचा ‘चकदा एक्स्प्रेस’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र या चित्रपटाविषयी सध्या कोणतीच अपडेट समोर आली नाही. यामध्ये अनुष्का क्रिकेटरची भूमिका साकारताना दिसणार आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.