AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND VS SL: जयदेव शाह कोण आहे? ज्याच्या हातात रोहितने मालिका विजयानंतर दिली ट्रॉफी

IND VS SL: भारताने रविवारी श्रीलंकेविरुद्धचा (India vs Srilanka) तिसरा टी-20 सामना सहज जिंकला व मालिका 3-0 ने खिशात घातली.

IND VS SL: जयदेव शाह कोण आहे? ज्याच्या हातात रोहितने मालिका विजयानंतर दिली ट्रॉफी
| Updated on: Feb 28, 2022 | 4:58 PM
Share

धर्मशाळा: भारताने रविवारी श्रीलंकेविरुद्धचा (India vs Srilanka) तिसरा टी-20 सामना सहज जिंकला व मालिका 3-0 ने खिशात घातली. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग तिसऱ्यांदा क्लीन स्वीप विजय मिळवला. मालिकाविजयानंतर सर्वप्रथम रोहितने संघासोबत विजयी ट्रॉफी उंचावली. त्यानंतर त्याने ती ट्रॉफी एका व्यक्तीच्या हातात दिली. रोहितने ज्याच्या हातात ट्रॉफी दिली, तो कोण आहे? असा प्रश्न चाहते आत रोहितला सोशल मीडियावर विचारत आहेत. प्रत्येक सामन्यागणिक भारतीय संघ यशाचा नवीन अध्याय लिहितोय. श्रीलंकेला नमवून काल भारताने टी-20 क्रिकेटमध्ये (T-20 Cricket) मालिका विजयाची हॅट्रिक केली. युवा खेळाडू दमदार प्रदर्शन करत आहेत. पण रोहित शर्माच्या फॉर्मवर नजर टाकल्यास चिंता थोडी वाढते. भारतीय संघाचा हाच फॉर्म कसोटीमध्येही कायम राहिल अशी अपेक्षा आहे.

जयेदव शाह कोण आहे?

सामना संपल्यानंतर प्रेझेंटेशनचा कार्यक्रम झाला. रोहित शर्माने ट्रॉफी स्वीकारल्यानंतर तो दुसऱ्या खेळाडूंकडे घेऊन गेला. फोटोसेशन झाल्यानंतर रोहित शर्माने जयदेव शाहच्या हातात ट्रॉफी दिली. रोहित त्याच्याबरोबर हास्यविनोद करताना दिसला. हे फोटो समोर आल्यानंतर चाहते रोहितला हा जयदेव शाह कोण आहे? म्हणून विचारत आहेत. जयदेव शाह हा टीम इंडिया सोबत राहणारा बीसीसीआयचा एक प्रतिनिधी आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 सीरीजध्ये तो संघासोबत होता. प्रत्येक सीरीज, टुर्नामेंटआधी बोर्डाकडून अशी एक व्यक्ती भारतीय संघासोबत पाठवली जाते. ज्याला मॅनेजरही म्हणतात. जयदेव शाहचा रोल नेमका तोच होता.

जयदेव शाह सौराष्ट्राचा कॅप्टन

जयदेव शाह स्वत: एक क्रिकेटर आहे. रणजी स्पर्धेत त्याने सौराष्ट्राच नेतृत्व केलं आहे. जयवदे शाहने 120 फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये 30 च्या सरासरीने 5354 धावा केल्या आहेत. यात दहा शतक आहेत. लिस्ट ए च्या सामन्यातही जयदेव शाहच्या 1 हजारपेक्षा जास्त धावा आहेत. बीसीसीआयचे माजी सचिव निरंजन शाह यांचा तो मुलगा आहे. शाह कुटुंबाच सौराष्ट्र क्रिकेटमध्ये दीर्घकाळापर्यंत वर्चस्व राहिलं आहे. निरंजन शाह बीसीसीआयचे महत्त्वाचे अधिकारी होते. आता त्यांचा मुलगाही नवीन भूमिकेत दिसतोय.

who is jaydev shah bcci representative india vs sri lanka t20 series rohit sharma trophy

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.