AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरसीबी विजयी परेडमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? कुठे काय चुकलं? जाणून घ्या

आरसीबीच्या विजयी जल्लोषाला गालबोट लागलं आणि 10 चाहत्यांना जीव गमवावा लागला. आरसीबीने 17 वर्षानंतर जेतेपद मिळवल्याने आनंद होता. मात्र या घटनेमुळे आनंदावर विरजण पडलं. ही दुर्घटना कशी घडली आणि यासाठी कोण जबाबदार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

आरसीबी विजयी परेडमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? कुठे काय चुकलं? जाणून घ्या
आरसीबी विजयी परेडमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? कुठे काय चुकंल? जाणून घ्याImage Credit source: video grab
| Updated on: Jun 04, 2025 | 8:04 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेचं जेतेपद मिळवल्यानंतर आरसीबीच्या चाहत्यांचा उत्साह गगनात मावेनासा झाला होता. गेली 17 वर्षे चषक नाही म्हणून सोशल मीडियावर डिवचलं जात होतं. पण चषक हाती आल्याने डिवचण्याची संधीच मिळणार नाही, म्हणून कार्यकर्ते उत्साही होते. त्यामुळे आपल्या संघाची एक झलक पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. विजयी जल्लोषाचे प्रत्येक क्षण डोळ्यात साठवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न होता. पण एका क्षणात या आनंदावर विरजण पडलं. काही कळायच्या आत चेंगराचेंगरी झाली आणि दहा चाहत्यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे आनंदाच्या क्षणी निराशेचं वातावरण पसरलं. चिन्नास्वामी स्टेडियमवर यापूर्वी असंख्य सामने झाले आहेत. लोकांनी स्टेडियमवर गर्दी केली होती. पण यासारखी भयानक दुर्घटना कधीच घडली नव्हती. या भयानक घटनेनंतर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी एक निवेदन जारी करत म्हटले की, आयोजकांनी आरसीबीच्या आयपीएल विजयाच्या जल्लोषाचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करायला हवे होते. दुसरीकडे, आयपीएल जिंकणाऱ्या विविध संघांनी आपापल्या शहरांमध्ये विजय साजरा केला आहे. केकेआर, मुंबई इंडियन्स, सीएसके सारख्या संघांनी भव्य केलं होतं. पण आयपीएल जिंकल्यानंतर एक किंवा दोन दिवसांनी आयोजन केलं होतं. पण आरसीबीच्या विजयानंतर यात घाई केल्याचं बोललं जात आहे.

सरकारने चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी विजयोत्सवाचे आयोजन केले होते. त्यामुळे कर्नाटकात राजकारण तापलं आहे. कर्नाटक भाजप अध्यक्ष बी वाय विजयेंद्र म्हणाले की, “या दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे. जेव्हा संपूर्ण देश आणि कर्नाटक आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करत होते, तेव्हा राज्य सरकारने कोणतीही तयारी न करता विजय रॅली आयोजित करण्याची घाई केल्याने ही दुर्घटना घडली. रुग्णवाहिकेची सुविधा नव्हती. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश द्यावेत.”

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?