Who is Umran Malik: उमरान मलिक… ज्याची वादळी गोलंदाजी पाहून रवी शास्त्रींपासून इरफान पठाणपर्यंत सगळे झाले फॅन

सनरायझर्स हैदराबादचा (SRH) वेगवान गोलंदाज उमरान मलिक सध्या खूप चर्चेत आहे. उमरानने मंगळवारी आपल्या वेगाने राजस्थान रॉयल्सच्या (RR) फलंदाजांना अडचणीत आणले. उमरानने चार षटकात 39 धावा देत जॉस बटलर आणि देवदत्त पडिक्कल या दोघांची विकेट घेतली.

Who is Umran Malik: उमरान मलिक... ज्याची वादळी गोलंदाजी पाहून रवी शास्त्रींपासून इरफान पठाणपर्यंत सगळे झाले फॅन
Umran Malik
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 11:25 AM

मुंबई : सनरायझर्स हैदराबादचा (SRH) वेगवान गोलंदाज उमरान मलिक सध्या खूप चर्चेत आहे. उमरानने मंगळवारी आपल्या वेगाने राजस्थान रॉयल्सच्या (RR) फलंदाजांना अडचणीत आणले. उमरानने चार षटकात 39 धावा देत जॉस बटलर आणि देवदत्त पडिक्कल या दोघांची विकेट घेतली. उमरान मलिकची (Umran Malik) सुरुवात चांगली झाली नाही आणि त्याने पहिल्याच षटकात 21 धावा दिल्या, ज्यामध्ये जॉस बटलरच्या 20 धावा होत्या. पहिलं षटक खराब जाऊनही उमरानचे मनोधैर्य खचले नाही आणि त्याने पुढच्याच षटकात बटलरला माघारी धाडलं. उमरानने त्याच्या स्पेल दरम्यान 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली.

भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीही उमरानचे फॅन झाले आहेत. रवी शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना सांगितले की, ‘उमरान मलिक खूप प्रतिभावान आहे आणि तो खूप चांगला गोलंदाज आहे. उमरान मलिक हा भारतीय संघात असायला हवा. तो उच्च स्तरावर खेळण्यास तयार होईल तेव्हा तो सुपरस्टार म्हणून उदयास येईल.

वडीलांचं भाजीपाल्याचं दुकान

22 वर्षीय उमरान मलिकसाठी आयपीएलपर्यंतचा हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. उमरानचे वडील अब्दुल मलिक हे फळ आणि भाजीपाल्याचे दुकान चालवतात. उमरानने चार वर्षांपूर्वी गुज्जर नगर येथील काँक्रीटच्या खेळपट्टीवर क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली.उमरान अधूनमधून रात्री टेनिस बॉलने क्रिकेट खेळायला जायचा तेव्हा अब्दुल मलिक आपल्या मुलाच्या मागे जायचे. उमरान चुकीच्या मार्गावर जाण्याची भीती अब्दुल मलिक यांना होती. आपला मुलगा काय करतोय, यावर ते बारीक नजर ठेवून असायचे. अंडर 19 ट्रायलमध्ये यश मिळवल्यानंतर उमरान मलिकची जम्मू-काश्मीर संघात निवड झाली तेव्हा त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले.

संघातील खेळाडू उमरानला घाबरायचे

उमरान मलिकला जम्मू आणि काश्मीरचे दिग्गज परवेझ रसूल आणि प्रशिक्षक इरफान पठाण यांनी जवळून पाहिले आहे, जे संपूर्ण प्रदेशात प्रतिभेच्या शोधात आहेत. परवेझ रसूल यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, ‘आमच्या संघातील काही ज्युनियर खेळाडू त्याला सामोरे जायला घाबरत होते. त्यांना दुखापत होण्याची भीती होती. त्याचा वेग जबरदस्त आहे. त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं. आता आयपीएलमध्ये तो लोकांचं लक्ष वेधून घेतोय.

इतर बातम्या

Rohit Sharma Fined, IPL 2022: Mumbai Indians ला दुहेरी फटका, रोहितला भरावा लागला 12 लाखाचा दंड

IPL 2022 Points Table मध्ये कुठली टीम कुठल्या स्थानावर, Mumbai indians सह पराभूत संघांची स्थिती काय जाणून घेऊया….

RCB vs KKR IPL 2022 Match Prediction: RCB पराभवातून उसळी घेईल? आज श्रेयसच्या KKR शी भिडणार

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.