Video : चेन्नई सुपर किंग्सचं टेन्शन वाढलं! महेंद्रसिंह धोनीनंतर कर्णधारपद कोण भूषवणार? झालं असं की…
आयपीएल 2025 स्पर्धा सुरु असताना चेन्नई सुपर किंग्सच्या चिंतेत वाढ झाली आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. यात कर्णधार धोनी लंगडत असताना दिसला. त्यामुळे पुढच्या सामन्यात खेळला नाही तर कर्णधार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ससाठी यापुढे सर्वच सामने करो या मरोची लढाई असणार आहे. कारण आतापर्यंत खेळलेल्या सात पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सवर आधीच दडपण आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड संपूर्ण स्पर्धेला मुकला आहे. त्यानंतर कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंह धोनीच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्याच्या नेतृत्वात संघाने पहिल्यांदा पराभव पाहीला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात जबरदस्त कमबॅक केलं. लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करून प्लेऑफच्या शर्यतीत असल्याचं दाखवून दिलं आहे. या सामन्यात धोनीने आपल्या शैलीत सामना संपवला. 30 चेंडूत 55 धावांची गरज असताना धोनी मैदानात उतरला होता. पण संघाला विजयी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. असं असताना धोनीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे.
विजयानंतर चेन्नई सुपर किंग्स संघाचं हॉटेलमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. पण यावेळी महेंद्रसिंह धोनी लंगडताना दिसला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, लखनौ विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या षटकात असाच लंगडताना दिसला होता. जर महेंद्रसिंह धोनी जखम गंभीर असेल तर मात्र चेन्नई सुपर किंग्सची चिंता वाढणार आहे. 2024 मध्येही धोनीला दुखापत होती. पूर्णपणे फीट नव्हता. पण इम्पॅक्ट प्लेयरचा पुरेपूर फायदा घेतला. तसेच खेळणं सुरुच ठेवलं. त्याच्या गुडघ्यावर 1 जून 2023 रोडी मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात सर्जरी झाली होती.
महेंद्रसिंह धोनी दुखापतग्रस्त असेल तर कर्णधारपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर सोपवायची हा प्रश्न आहे. चेन्नई सुपर किंग्सकडे दोन पर्याय असणार आहेत. रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे हे दोन खेळाडू कर्णधारपद भुषवू शकतात. रवींद्र जडेजाने यापूर्वी कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. मात्र मध्यातच त्याच्याकडून कर्णधारपद काढून धोनीकडे सोपवलं. 2024 स्पर्धेत कर्णधारपदाची धुरा ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर टाकली. त्यानंतर पुन्हा कर्णधारपद धोनीकडे आलं. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सला प्रत्येक सामन्यात विजयाचं आव्हान असणार आहे. ऋतुराज गायकवाडच्या जागी संघात आयुष म्हात्रेला स्थान मिळालं आहे.
