AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खिशात 100 रुपये आणि…! जसप्रीत बुमराहबाबत कपिल देव बोलून गेले असं काही…

जसप्रीत बुमराहशिवाय टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उतरणार आहे. जसप्रीत बुमराहला पाठिची दुखापत असल्याने खेळणार नाही. त्यामुळे अनेकांना ही गोष्ट पचनी पडताना दिसत नाही. यामुळे टीम इंडियाचं नुकसान झाल्याची अनेकांची भावना आहे. मात्र यावर माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी परखड मत व्यक्त केलं आहे.

खिशात 100 रुपये आणि...! जसप्रीत बुमराहबाबत कपिल देव बोलून गेले असं काही...
| Updated on: Feb 14, 2025 | 9:09 PM
Share

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. पण या स्पर्धेत जसप्रीत बुमराह नसल्याने अनेकांना काहीतरी उणीव असल्याचं वाटत आहे. जसप्रीत बुमराहशिवाय टीम इंडिया हे समीकरणच काही जणांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे अनेक खेळाडूंनी निराशा व्यक्त केली आहे. आता बुमराह स्पर्धेत खेळणार नसल्याने माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी परखड प्रतिक्रिया दिली आहे. कपिल देव यांनी स्पष्टपणे सांगितलं की, जो खेळाडू संघातच नाही त्याच्याबाबत चर्चा तरी कशाला करायची. तुमच्या खिशात 100 असतील तर खूश व्हा, नसतील त्यासाठी दु:खी होण्याचं कारण नाही. जर खेळाडू वर्षातील 10 महिने क्रिकेट खेळतील तर हा चिंतेचा विषय आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटच्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला पाठदुखीचा त्रास जाणवला होता. तेव्हापासून आतापर्यंत बुमराह आराम करत आहे. नुकतीच त्याच्या पाठदुखीची तपासणी करण्यात आली आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अनफिट असल्याचं सांगितलं गेलं.

‘मला अशी चिंता सतावत आहे की, तो वर्षातील दहा महिने खेळत आहे. इतकं क्रिकेट खेळणार तर दुखापतीची शक्यता आहे. तसं पण जे खेळाडू संघात नाहीत त्यांच्याबाबत का चर्चा करायची. हा सांघिक खेळ आणि टीमला जिंकवायचं आहे. एखाद्या व्यक्तीला नाही. हे बॅडमिंटन, टेनिस किंवा गोल्फ नाही. आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम म्हणून भाग घेत आहोत. जर आपण एक टीम म्हणून खेळलो तर नक्कीच जिंकू.’, असं कपिल देव म्हणाले.

टीम इंडियात मोहम्मद शमी 14 महिन्यानंतर परतला. गेल्या वर्षभरापासून दुखापतीमुळे टीम इंडियापासून दूर होता. मात्र त्याने आता कमबॅक केलं आहे. पण इंग्लंड दौऱ्यात त्याच्या गोलंदाजीला हवी धार दिसली नाही. दुसरीकडे, टीम इंडियात हार्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांच्यासारखे युवा गोलंदाज आहेत. त्यामुळे टीम इंडियाला आपल्या फलंदाजांवर जास्तीत जास्त अवलंबून राहावं लागणार आहे. दरम्यान, दुबईच्या खेळपट्टीचा अंदाज घेऊन संघात पाच फिरकीपटूंचा समावेश केला आहे. पण दुबईची खेळपट्टी फिरकीपेक्षा मिडीयम पेसर्सला मदत करते.

त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.