AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नो हँडशेक प्रकरणी विराट कोहलीला का शिक्षा झाली नाही? हेडसोबत असं वागण्याचं कारण काय?

आयपीएल 2026 स्पर्धेतील 67वा सामना वेगळ्याच कारणामुळे चर्चेत राहिला. कारण या सामन्यात विराट कोहली आणि ट्रेव्हिस हेड यांच्यात वाद झाला. सामन्यानंतर विराट कोहलीने त्याच्याशी हातही मिळवला नाही. पण असं असूनही बीसीसीआयने विराट कोहलीवर कारवाई का केली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नो हँडशेक प्रकरणी विराट कोहलीला का शिक्षा झाली नाही? हेडसोबत असं वागण्याचं कारण काय?
नो हँडशेक प्रकरणी विराट कोहलीला का शिक्षा झाली नाही? हेडसोबत असं वागण्याचं कारण काय?Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 25, 2026 | 8:07 PM
Share

Virat Kohli vs Travis Head Handshake Controversy: आयपीएल 2026 स्पर्धेलाही वादाची किनार लाभली आहे. त्यातही विराट कोहली आणि ट्रेव्हिस हेड प्रकरण चांगलं गाजत आहे. या दोन्ही दिग्गज खेळाडूंमध्ये आयपीएल स्पर्धेच्या 67व्या सामन्यात वाद झाला. या सामन्यात विराट कोहलीने ट्रेव्हिस हेडला काही बोलला होता आणि त्याला हेडनेही प्रत्युत्तर दिलं. पण इथपर्यंत सर्वकाही ठीक होतं. सामन्यानंतर विराट कोहलीच्या मनात कटुता असल्याचं दिसून आलं. सामना संपल्यानंतर हस्तांदोलन करण्याची प्रथा आहे. हा सामना जिंकल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद आणि आरसीबीचे खेळाडू रांगेत हस्तांदोलन करत होते. तेव्हा विराट कोहलीने ट्रेव्हिस हेडसोबत हात मिळवला नाही आणि पुढे निघून गेला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण असं असूनही बीसीसीआयने विराट कोहलीवर कारवाई का केली नाही? इतकंच काय तर त्याला समजही दिली नाही. चला जाणून घेऊयात कारण..

विराट कोहलीच्या कृतीवर कारवाई का नाही?

विराट कोहलीने ट्रेव्हिस हेडसोबत हातमिळवणी केली नाही, त्यामुळे सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यामुळे बीसीसीआयकडून कारवाईची अपेक्षा होती. पण विराट कोहलीने हात न मिळवून कोणताही नियम मोडलेला नाही. हँडशेक हे स्पिरिट ऑफ क्रिकेटमुळे केलं जात. पण हातमिळवणी केलीच पाहीजे असा काही नियम नाही. आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेत भारतीय संघही पाकिस्तानसोबत हातमिळवणी करत नाही. तेव्हा आयसीसीने काहीच कारवाई केली नाही. तसंच बीसीसीआयही या प्रकरणी काहीच करू शकत नाही. कारण हातमिळवणी करणं हा काही नियम नाही.

हँडशेक न करण्याचं कारण काय?

विराट कोहली आणि ट्रेव्हिस हेड यांच्यात वाद शिवांग कुमारच्या षटकात झाला. शिवांग कुमार चौथं षटक टाकण्यासा आला होता. तेव्हा वेंकटेश अय्यने त्याची धुलाई केली. या षटकाच्या शेवटच्या षटकात विराट कोहली आणि ट्रेव्हिस हेड यांच्या शा‍ब्दिक चकमक झाली. विराट कोहलीने त्याला काहीतरी बोलला. पण ट्रेव्हिस हेड हसत राहिला. त्यानंतर विराटने त्याला गोलंदाजी करण्यास सांगितलं. पण विराट कोहली त्यानंतर फक्त 15 धावा करून बाद झाला. पॅट कमिन्सने 19वं षटक ट्रेव्हिस हेडला सोपवलं. या षटकात त्याने रजत पाटीदारला बाद केलं. हा सामना हैदराबादने 55 जिंकला.

Follow Us
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकार सकारात्मक? विखे पाटलांनी दिला सर्वात...
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकारा मोठा निर्णय? विखे पाटलांनी दिला सर्वात मोठा संकेत, दोन-तीन दिवसांत...
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; 19 जणांवर गुन्हा दाखल!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा अंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच...
दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं..
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं कारण काय?
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट