AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs IND | तिलक वर्मा याचं पहिलीवहिलं अर्धशतक, विंडिज विरुद्ध रचला इतिहास, झटक्यात दोघांना पछाडलं

Tilak Varma Wi vs Ind 2nd T20i | तिलक वर्मा याने विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं.

WI vs IND | तिलक वर्मा याचं पहिलीवहिलं अर्धशतक, विंडिज विरुद्ध रचला इतिहास, झटक्यात दोघांना पछाडलं
| Updated on: Aug 06, 2023 | 11:29 PM
Share

गयाना | विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात कॅप्टन हार्दिक पंड्या याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र कॅप्टन हार्दिकचा बॅटिंग करण्याचा निर्णय चुकीचा ठरला. टीम इंडियाने 100 धावांच्या आताच 4 विकेट्स गमावल्या. मात्र युवा तिलक वर्मा मैदानात टिकून राहिला आणि विंडिजच्या गोलंदाजांची धुलाई केली. तिलक वर्मा याने यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलंवहिलं अर्धशतक पूर्ण केलं. तिलकने यासह कीर्तीमान केला.

तिलक वर्मा याने आपल्या कारकीर्दीतील दुसऱ्या टी 20 सामन्यात 39 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं. तिलक यासह कमी वयात टी 20 क्रिकेटमध्ये अर्धशतक ठोकणारा टीम इंडियाचा दुसरा युवा फलंदाज ठरला. तिलकने वयाच्या 20 वर्ष 271 दिवशी ही कामगिरी केली. तिलकने यासह ऋषभ पंत आणि रॉबिन उथप्पा या दोघांना मागे टाकलं.

तिलक वर्माची विक्रमी कामगिरी

टीम इंडियाकडून ऋषभ पंत याने वयाच्या 21 वर्ष 138 दिवशी अर्धशतक ठोकलं होतं. तर रॉबिन उथप्पा याने 21 वर्ष 307 व्या दिवशी अर्धशतक केलं होतं. तिलकने या दोघांना मागे टाकलं. तर टीम इंडियाकडून सर्वात कमी वयात अर्धशतक करण्याचा विक्रम हा रोहित शर्मा याच्या नावावर आहे. रोहितने वयाच्या 20 वर्ष 143 व्या दिवशी ही कामगिरी केली होती.

तिलक वर्मा याचा कमी वयात मोठा धमाका

तिलकने अर्धशतक ठोकल्यानंतर त्याच्याकडून मोठी खेळीची अपेक्षा होती. मात्र तिलक मोठा फटका मारण्याच्या नादात कॅच आऊट झाला. तिलक 16 व्या ओव्हरमधील 5 व्या बॉलवर अकील हुसैन याच्या बॉलिंगवर आऊट झाला. तिलकने 51 धावांच्या खेळीत 5 फोर आणि 1 कडक सिक्स ठोकला.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | रोवमॅन पॉवेल (कर्णधार), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉनसन चार्ल्स (विकेटकीपर), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसैन, अल्जारी जोसेफ आणि ओबेड मॅकॉय.

माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....