AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs IND Test Series 2023 | रोहित शर्मा याच्या नेतृत्वात हा बॉलर विंडिज विरुद्ध टेस्ट डेब्यूसाठी सज्ज

West Indies vs Team India Test Series 2023 | टीम इंडिया वेस्ट इंडिज दौरा भरगच्च असा आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात कसोटी, वनडे आणि टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे.

WI vs IND Test Series 2023 | रोहित शर्मा याच्या नेतृत्वात हा बॉलर विंडिज विरुद्ध टेस्ट डेब्यूसाठी सज्ज
| Updated on: Jul 04, 2023 | 12:00 AM
Share

मुंबई | क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची उत्सूकता लागून राहिली आहे. टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला आता मोजून 8 दिवस बाकी आहेत. टीम इंडिया या दौऱ्याला कसोटी मालिकेने सुरुवात करणार आहे. एकूण 2 सामन्यांची मालिका असणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध रोहित शर्मा कॅप्टन्सी करणार आहे. तर अजिंक्य रहाणे याच्याकडे उपकर्णधारपदाची सूत्रं आहेत. निवड समितीने या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या 3 युवा खेळाडूंची पहिल्यांदाच निवड केली आहे. यामध्ये ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार आणि यशस्वी जयस्वाल यांचा समावेश आहे.

या तिघांची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडियात राखीव खेळाडू म्हणून सहभागी करण्यात आलं होतं. मात्र ऋतुराजला लग्नामुळे wtc final साठी लंडनला जाता आलं नाही. त्यामुळे ऋतुराजच्या जागी यशस्वी जयस्वाल याला संधी देण्यात आली. या मोठ्या सामन्यात मुकेश कुमार आणि यशस्वी जयस्वाल या दोघांचा सराव झाला.

आता निवड समितीने यशस्वी, ऋुतराज आणि मुकेश यांचा मुख्य संघात समावेश केला आहे. विंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मुकेश कुमार याला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

विंडिज विरुद्ध टीम इंडिया, पहिली कसोटी, 12 ते 16 जुलै, विंडसर पार्क, डोमिनिका.

विंडिज विरुद्ध टीम इंडिया, दुसरी कसोटी, 20 ते 24 जुलै, क्विन्स पार्क, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद.

विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.

टीम इंडिया विरुद्ध विंडिज एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 27 जुलै, बारबाडोस.

दूसरा सामना, 29 जुलै, बारबाडोस.

तिसरा सामना , 1 ऑगस्ट, त्रिनिदाद.

विडिंज विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.