AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs IND : मानलं भावा तुला, मुंबईच्या वानखेडेबाहेर पाणीपुरी विकणाऱ्या पोराची टीम इंडियात निवड!

Team India Squad for WI Tour : कधी काळी मुंबईच्या वानखेडे मैदानाच्या पाणी पुरीचा ठेला लावणारा जयस्वाल आता टीम इंडियाचं प्रतिनिधित्त्व करताना दिसणार आहे. त्याच्या जिद्द आणि चिकाटीला यश आलं आहे.

WI vs IND : मानलं भावा तुला, मुंबईच्या वानखेडेबाहेर पाणीपुरी विकणाऱ्या पोराची टीम इंडियात निवड!
| Updated on: Jun 23, 2023 | 4:54 PM
Share

मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. यामधील कसोटी संघामध्ये दोन युवा खेळाडूंची निवड झाली आहे. ऋतुराज गायकवाड आणि दुसरा यशस्वी जयस्वाल आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खोऱ्याने धावा काढणाऱ्या यशस्वीने 14 सामन्यात 639 धावा केल्या होत्या.  कधी काळी मुंबईच्या वानखेडे मैदानाच्या पाणी पुरीचा ठेला लावणारा जयस्वाल आता टीम इंडियाचं प्रतिनिधित्त्व करताना दिसणार आहे.

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमध्ये पहिला कसोटी सामना  12 जुलैला होणार आहे. या सामन्यामध्ये जयस्वालला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे कसोटी संघामधून भरवशाचा फलंदाज अशी ओळख निर्माण केलेल्या चेतेश्वर पुजारा याला डच्चू दिला आहे. तर अजिंक्य रहाणे याला परत एकदा उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

भारताचा एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (C), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (W), हार्दिक पंड्या (VC), शार्दुल ठाकूर, आर. जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

भारताचा कसोटीसाठी संघ |रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.

वेस्टइंडीज दौऱ्याचं वेळापत्रक :

टेस्ट मॅच

पहिली टेस्ट 12 ते 16 जुलै, डोमिनिका दुसरी टेस्ट 20 ते 24 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन

वनडे मॅच

पहिली मॅच – 27 जुलै, ब्रिजटाउन दुसरी मॅच – 29 जुलै, ब्रिजटाउन तीसरी मॅच – 1 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन

टी- 20  सामने

पहिली मॅच – 3 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन दुसरी मॅच – 6 ऑगस्ट, गुयाना तीसरी मॅच -8 ऑगस्ट, गुयाना चौथी मॅच -12 ऑगस्ट, फ्लोरिडा पाजवी मॅच -13 ऑगस्ट, फ्लोरिडा

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.