AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केकेआरच्या मुख्य प्रशिक्षकपदी अभिषेक नायर, रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार? त्या पोस्टमुळे रंगली चर्चा

आयपीएल 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं असून फ्रेंचायझींनी कंबर कसली आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाने आता संघात बदल करण्यास सुरुवात केली. टीम इंडियाचा माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर याची कोलकाता नाइट रायडर्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. असं असताना मुंबई इंडियन्सने क्रिप्टीक पोस्ट केली आहे.

केकेआरच्या मुख्य प्रशिक्षकपदी अभिषेक नायर, रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार? त्या पोस्टमुळे रंगली चर्चा
केकेआरच्या मुख्य प्रशिक्षकपदी अभिषेक नायर, रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार? त्या पोस्टमुळे रंगली चर्चाImage Credit source: Mumbai Indians Twitter
| Updated on: Oct 30, 2025 | 6:12 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत कोण कोणत्या संघातून खेळणार? कोणाला रिलीज करणार? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. सध्या फॉर्मात असलेल्या खेळाडूंवर फ्रेंचायझींची नजर आहे. इतकंच काय तर मागच्या पर्वात सुमार कामगिरी केलेल्या खेळाडूंना डच्चू देण्याची तयारी केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने या स्पर्धेपूर्वी फासे टाकण्यास सुरुवात केली आहे. संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अभिषेक नायर याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता इतरही चर्चा गरम झाल्या आहेत. आता रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडून कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत जाणार अशी अफवा उडाली आहे. त्यात मुंबई इंडियन्सने केलेल्या क्रिप्टिक पोस्टमुळे संभ्रम वाढला आहे. खरं तर मुंबई इंडियन्सने सोशल मिडिया हँडलवर रोहित शर्माचा फोटो पोस्ट करत उत्तर दिलं आहे. मुंबई इंडियन्सने शाहरूख खानचा डायलॉग लिहून उडलेल्या अफवा शांत केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्माने आपल्या फलंदाजीचा दणका दाखवला. पहिल्या सामन्यात फक्त 8 धावा करून बाद झाला होता. पण उर्वरित दोन सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. तिसऱ्या वनडे सामन्यात शतकी खेळी करत आपल्या फलंदाजीचं अस्तित्व दाखवून दिलं. या मालिकेत रोहित शर्माने 202 धावा केल्या आणि मालिकावीराचा पुरस्कारही पटकावला. रोहित शर्मा वनडे क्रिकेटमधील नंबर एक खेळाडू आहे. त्यामुळे रोहित शर्मा उडालेल्या अफवेवर मुंबई इंडियन्सने पोस्ट करत लिहिलं की, ‘𝗦𝘂𝗻 𝘄𝗶𝗹𝗹 𝗿𝗶𝘀𝗲 𝘁𝗼𝗺𝗼𝗿𝗿𝗼𝘄 𝗮𝗴𝗮𝗶𝗻 ye ये तो कंफर्म है, लेकिन (K)night मुश्किल ही नहीं, नामुमकिन है.’

रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच वेळा जेतेपदाला गवसणी घातली आहे. तसेच आयपीएल स्पर्धेत फलंदाजीतही योगदान दिलं आहे. रोहित शर्माने 272 आयपीएल सामन्यात 7046 धावा केल्या आहेत. यात 2 शतकं आणि 47 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये त्याने 304 षटकार आणि 640 चौकार मारले आहे. पण रोहित शर्माकडे कर्णधारपद नाही. मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे आहे. त्यामुळे त्याच्यासाठी इतर फ्रेंचायझी फिल्डिंग लावून आहेत. पण मुंबई इंडियन्स रोहित शर्माला काही सोडणार नाही.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.