AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्यकुमार क्वॉलिफायर 2 फेरीत पंजाब किंग्सविरुद्ध खेळणार का? मुंबई इंडियन्सच्या हेड कोचने सांगितलं की…

आयपीएल एलिमिनेटर फेरीत मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला 20 धावांनी पराभूत केलं. यासह क्वॉलिफायर 2 फेरीत धडक मारली आहे. पंजाब किंग्सविरुद्ध हा सामना होणार आहे. असं असताना सूर्यकुमार यादवच्या बातमीने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

सूर्यकुमार क्वॉलिफायर 2 फेरीत पंजाब किंग्सविरुद्ध खेळणार का? मुंबई इंडियन्सच्या हेड कोचने सांगितलं की...
सूर्यकुमार यादवImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 31, 2025 | 6:37 PM
Share

आयपीएल 2025 जेतेपदापासून मुंबई इंडियन्स दोन विजय दूर आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजेच क्वॉलिफायर 2 मध्ये पंजाब किंग्सचं आव्हान असणार आहे. पंजाब किंग्सला पराभूत केल्यानंतर अंतिम फेरीत स्थान मिळणार आहे. मुंबई इंडियन्सकडे सहाव्यांदा जेतेपद जिंकण्याची संधी आहे. असं असताना पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबईचे हेड कोच महेला जयवर्धनेने सूर्यकुमार यादवच्या फिटनेसबाबत खुसाला केला आहे. महेला जयवर्धनेला पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवच्या दुखापतीबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा महेला जयवर्धनेने सांगितलं की, ‘व्यस्त वेळापत्रकामुळे दुखापत किंवा मांसपेशीत ताण येणं हा सामान्य समस्या आहेत.’ असं सांगताना सूर्यकुमार यादव पुढच्या सामन्यात खेळणार असल्याचंही स्पष्ट केलं. सूर्यकुमार यादवने या पर्वात 673 धावा केल्या आहेत. तसेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे.

महेला जयवर्धनेने सांगितलं की, ‘मला वाटते की ह काही जुने खेळाडू आहेत. त्याने थोडी पट्टी बांधायची आहे. तसेच थोडा वेळ द्यायचा आहे. आम्हाला माहिती आहे की हे कठीण काम आहे. पण मला वाटतं की प्रत्येक जण फिट आहे. त्यांना थोडीफार दुखापत आहे. पण चिंतेचं कारण नाही. मी फिजिओकडून काही ऐकलं नाही. मला पूर्ण विश्वास आहे की ते एका पायावरही आमच्यासाठी खेळतील.’ सूर्यकुमार यादवने गुजरात टायटन्सविरुद्ध 20 चेंडूत 33 धावांची खेळी केली. त्यानंतर क्षेत्ररक्षण करताना सूर्यकुमार यादवला दुखापतीचा त्रास जाणवला. त्यानंतर फिजिओ मैदानात आला आणि त्याने तात्पुरत्या स्वरुपाचे उपचार केले.

सूर्यकुमार यादवने 2025 स्पर्धेतली 15 सामन्यात 673 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत त्याच्या पुढे साई सुदर्शन आहे. साई सुदर्शनने 759 धावा केल्या आहे. तसं पाहीलं तर सूर्यकुमारकडे दोन सामने आहेत. या दोन सामन्यात त्याला 87 धावांची खेळी करायची आहे. तर त्याच्या डोक्यावर ऑरेंज कॅप असेल. 1 जून रोजी मुंबई इंडियन्सचा सामना पंजाब किंग्सशी होणार आहे. हा सामन्यात विजय मिळाला तर 3 जून रोजी आरसीबीविरुद्ध अंतिम सामना खेळेल. आयपीएल 2025 स्पर्धेचे शेवटचे दोन सामने अहमदाबादमध्ये खेळले जातील.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.