
नवी मुंबई | वूमन्स क्रिकेट टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा आणि अंतिम टी 20 सामना आज 9 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. सामन्याचं आयोजन हे नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.त त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस करण्यात आला. नाणेफेकीचा कौल हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला. कॅप्टन एलिसा हिली हीने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. एकूण 3 सामन्यांची मालिका ही सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांना ही मालिका जिंकण्याची 50-50 टक्के संधी आहे. त्यामुळे या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आमि टीम इंडिया दोन्ही संघात रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
ऑस्ट्रेलियाने या तिसऱ्या सामन्यासाठी टीममध्ये कोणताही बदल केलला नाही. ऑस्ट्रेलियाने आपल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियातही कोणताही बदल केलेला नाही. कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने टीम न बदलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता टीम इंडियाचे खेळाडू कॅप्टनचा निर्णय सार्थ ठरवतात का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
एलिसा हिली ही ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करतेय. एलिसाने आतापर्यंत एकूण 12 टी 20 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली आहे. एलिसाने या 12 पैकी 7 सामन्यात ऑस्ट्रेलियाला जिंकवलंय. तर 5 वेळा पराभवाचा सामना करावा लागलाय. आता तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही चमत्कार करुन मालिका जिंकून देणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, मॅच जिंकणार?
Australia have won the toss and elected to field
Follow the Match ▶️ https://t.co/nsPC3lefeg#TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Z7A0sO2uw3
— BCCI Women (@BCCIWomen) January 9, 2024
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग आणि तितास साधू.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | एलिसा हिली (कॅप्टन आणि विकेटकीपर), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, अॅश्ले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ग्रेस हॅरिस, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम, किम गर्थ आणि मेगन शूट.