AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs IND : हॅली मॅथ्यूजची विस्फोटक खेळी, विंडिजचा पलटवार, भारतावर 9 विकेट्सने विजय, मालिकेत बरोबरी

India Women vs West Indies Women 2nd T20I Match Result And Highlight : विंडिजने दुसऱ्या आणि करो या मरो सामन्यात टीम इंडियाचा 9 विकेट्सने धुव्वा उडवत शानदा विजय मिळवला आहे. विंडिजने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.

WI vs IND : हॅली मॅथ्यूजची विस्फोटक खेळी, विंडिजचा पलटवार, भारतावर 9 विकेट्सने विजय, मालिकेत बरोबरी
hayley matthews ind vs wi 2nd t20iImage Credit source: windies cricket x account
| Updated on: Dec 17, 2024 | 10:39 PM
Share

वूमन्स विंडिज क्रिकेट टीमने दुसऱ्या टी 20I सामन्यात पलटवार केला आहे. विंडिजने टीम इंडियाचा 9 विकेट्सने धुव्वा उडवला आहे.टीम इंडियाने विंडिजला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. विंडिजने हे आव्हान 15.4 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून सहज पूर्ण केलं. कॅप्टन हॅली मॅथ्यूज ही विंडिजच्या विजयाची नायिका ठरली. हॅलीने सर्वाधिक आणि नाबाद 85 धावांची खेळी केली. तर कियाना जोसेफ आणि शेमेन कॅम्पबेले या दोघींनीही शानदार खेळी करत विजयात योगदान दिलं. विंडिजने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.

विंडीजची बॅटिंग

हॅली मॅथ्यूज आणि कियाना जोसेफ या सलामी जोडीने विस्फोटक सुरुवात केली. या दोघींनी 66 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर कियाना जोसेफ 22 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 6 फोरसह 38 रन्स करुन आऊट झाली. त्यानंतर हॅली मॅथ्यूज आणि शेमेन कॅम्पबेले या जोडीनेच विंडिजला विजय मिळवून दिला. मॅथ्यूज आणि कॅम्पबेले या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 94 धावांची नाबाद भागीदारी केली. हॅली मॅथ्यूज हीने 47 बॉलमध्ये 17 फोरसह नॉट आऊट 85 धावा केल्या. तर शेमेन कॅम्पबेले हीने 26 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 29 धावा केल्या. टीम इंडियाकडून सायमा ठाकोर हीने एकमेव विकेट घेतली. तर इतर गोलंदाज निष्प्रभ ठरले.

त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियासाठी कॅप्टन स्मृती मंधाना आणि रिचा घोष या जोडीने केलेल्या खेळीमुळे टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. स्मृती मंधाना हीने सर्वाधिक 62 धावा केल्या. तर रिचा घोषने 32 धावाा जोडल्या. तर इतरांनी छोटेखानी खेळी केली. विंडिजच्या 4 गोलंदाजांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

विंडिजकडून मालिकेत बरोबरी

वूमन्स इंडिया प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मंधाना (कर्णधार), उमा चेत्री, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), राघवी बिस्त, सजीवन सजना, दीप्ती शर्मा, राधा यादव, सायमा ठाकोर, तितास साधू आणि रेणुका ठाकूर सिंग.

वूमन्स विंडीज प्लेइंग इलेव्हन : हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, शेमेन कॅम्पबेले (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, नेरिसा क्राफ्टन, शबिका गजनबी, जैदा जेम्स, अश्मिनी मुनिसार, ऍफी फ्लेचे आणि करिश्मा रामहरक.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.