IND W vs AUS W 2nd T20 | ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा 6 विकेट्सने पराभव, मालिका बरोबरीत

IND W AUS W : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 6 विकेटने विजय मिळवला आहे. तीन सामन्यांच्या मालिका 1-1 ने बरोबरीत झाली आहे. आजच्या सामन्यात फलंदाजांनी नांगी टाकली होती. त्यामुळे लहान लक्ष्याचा ऑस्ट्रेलियाने सहज पाठलाग केला.

IND W vs AUS W 2nd T20 | ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा 6 विकेट्सने पराभव, मालिका बरोबरीत
ind w vs aus w second t 20 aus win
Follow us
| Updated on: Jan 07, 2024 | 11:39 PM

मुंबई : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 6 विकेटने विजय मिळवला आहे. टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करताना  20 ओव्हरमध्ये 130-8 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया संघाने 19 व्या ओव्हरमध्ये लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. ऑस्ट्रेलियाकडून एलिस पेरी हिने सर्वाधिक नाबाद 34 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून दीप्ती शर्मा हिने दोन विकेट घेतल्या. तीन सामन्यांच्या मालिका आता 1-1 ने बरोबरीत सुटले आहेत.

टीम इंडियाची बॅटींग

टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फंलादाजीसाठी आमंत्रित केलं होतं. पहिल्या टी-20 मध्ये शफाली वर्मा आणि स्मृती मंधानाची बॅट तळपलेली सर्वांनी पाहिली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात दोघींनाही मोठी खेळी करण्यात अपयश आलं. शफाली वर्मा 1 धाव,  जेमिमाह रॉड्रिग्स 13 धावा, हरमनप्रीत कौर 6 धावा या फेल गेल्या. दीप्ती शर्मा हिने सर्वाधिक 30 धावा केल्या. तर स्मृती मंधाना आणि रिचा घोष यांनी 23 धावा केल्या. टीम इंडियाचा या कमी धावसंख्येचा यशस्वीपणे पाठलाग केला.

ऑस्ट्रेलियाने संघाकडून लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या एलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी कडक सलामी दिली. दोघींनी पॉवरल प्लेमध्ये सुरूवातीला चांगली बॅटींग केली होती.  51 धावांवर एलिसा हिली 26 धावांवर असताना मोठ्या फटका मारण्याच्या नादात ती आऊट झाली. श्रेयांका पाटील शानदार कॅच घेतला. दीप्तीनेच दुसरा झटका देत बेथ मुनी हिला 20 धावांवर माघारी पाठवलं. श्रेयांक पाटीलने ताहलिया मॅकग्रा आऊट करत ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला.

ऑस्ट्रेलियाच्या सामन्यातून हा सामना सुटत चालला असं वाटत असताना एलिस पेरीने आक्रमक नाबाद 34 धावांची खेळी केली. तर फोबी लिचफील्डने नाबाद 18 धावा केल्या. दोघांनी केलेल्या भागीदारीने विजयावर शिक्कामोर्तब केलं.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग आणि तितास साधू.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | एलिसा हिली (कॅप्टन आणि विकेटकीपर), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, अॅश्ले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ग्रेस हॅरिस, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम, किम गर्थ आणि मेगन शूट.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.