मुंबई इंडियन्सने लीगच्या तोंडावर तडकाफडकी बदलला कॅप्टन, जुना मोहराच पण नवीन चेहरा

MI New Captain : मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनपदी आणखी एक मोठा बदल पाहायला मिळवला आहे. रोहित शर्मा याच्या जागी हार्दिक पंड्या याची निवड करण्यात आली आहे. अशातच मॅनेटमेंटने आणखी एक कर्णधार बदलला आहे,

मुंबई इंडियन्सने लीगच्या तोंडावर तडकाफडकी बदलला कॅप्टन, जुना मोहराच पण नवीन चेहरा
Follow us
| Updated on: Jan 07, 2024 | 10:58 PM

मुंबई : आयपीएल 2024 सुरू होण्याआधी मोठी उलटफेर झालेली पाहायला मिळाली. गुजरात टायटन्स संघाचा खेळाडू हार्दिक पंड्या याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. हार्दिकला कॅप्टन केल्यामुळे रोहित आता कॅप्टन नसणार आहे. मुंबईच्या टीम मॅनेजमेंटने घेतलेल्या या निर्णयामुळे चाहतेही नाराज झाले आहेत. अशातच मुंबई इंडियन्स संघाने नवीन कॅप्टनची घोषणा केली आहे. आता कोणत्या खेळाडूच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली आहे. कोण आहेत जाणून घ्या.

कोण आहे तो खेळाडू?

दक्षिण आफ्रिकेच्या SA 20 लीगमध्ये एमआय केपटाऊन संघाच्या कर्णधारपदी किरॉन पोलार्ड याची निवड झाली आहे. आधीचा कर्णधार राशिद खान दुखापतीमधून सावरत आहे. राशिद खान दुखापतीमुळे खेळणार नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये पोलार्डकडे संघाच्या कर्णधारपदाची धूरा देण्यात आली आहे. राशिद खानकडे पहिल्या सीझममध्ये संघाची धुरा देण्यात आली होती.

एमआय केप टाऊन संघाची धुरा राशिद खान याच्याकडे होती. यंदाच्या सीझनमध्ये राशिद खान खेळणार की नाही याबाबत काही नक्की नाही. टीम इंडियाविरूद्धच्या टी-20 मालिकेसाठी त्याची निवड झाली होती. मात्र दुखापतीमुळे तो खेळणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. किरॉन पोलार्ड हा पहिल्या सीझनमध्ये खेळला नव्हता त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये तो पदार्पण करणार आहे. आफ्रिकेमधील लीग आणि इंटरनॅशनल लीग 20 मधील सामन्यांच्या तारखा सारख्याच आहेत. त्यामुळे पोलार्डच्या जागी इंटरनॅशनल लीगमध्ये निकोलस पूरन याच्याकडे कर्णधारपद असणार आहे.

दरम्यान, किरॉन पोलार्ड हा मुंबई इंडियन्स संघाचा जुना मोहरा आहे. आयपीएलमध्ये पठ्ठ्याने एकट्याच्या दमावर सामने जिंकून दिले आहेत. फक्त बॅटींग आणि बॉलिंगने नाहीतर आपल्या अफलातून फिल्डिंगनेही त्याने संघासाठी मोलाची कामगिरी केली आहे. यंदा मुंबई इंडियन्स संघाने त्याला बॅटींग कोच म्हणून आपल्या ताफ्यात सामील केलं आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.