Women’s Asia Cup Live Streaming: भारत पाकिस्तान यांच्यात शनिवारी लढत, कधी आणि कुठे पाहता येणार सामना

वुमन्स आशिया कप 2026 स्पर्धा सुरू असून भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना पाहण्याची पर्वणी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. हा सामना 5 सप्टेंबरला होणार आहे. हा सामना कुठे आणि कधी पाहता येईल? याबाबत जाणून घ्या.

Womens Asia Cup Live Streaming: भारत पाकिस्तान यांच्यात शनिवारी लढत, कधी आणि कुठे पाहता येणार सामना
Women's Asia Cup Live Streaming: भारत पाकिस्तान यांच्यात शनिवारी लढत, कधी आणि कुठे पाहता येणार सामना
Image Credit source: ACC/Asian Cricket
| Updated on: Sep 04, 2026 | 6:07 PM

वुमन्स आशिया कप 2026 स्पर्धेचा थरार सुरू आहे. भारताने या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली असून उपांत्य फेरीत जागा पक्की केली आहे. थायलंड आणि हाँगकाँगला पराभवाची धूळ चारली आणि उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. तर पाकिस्तानने एक सामना खेळला असून त्यात विजय मिळवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या डोक्यावर कोणतंच टेन्शन नाही. पण पाकिस्तानची धाकधूक वाढली आहे. साखळी फेरीत भारताचा शेवटचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा भारताने जिंकला काय आणि हरला काही तसा काहीच फरक पडणार नाही. पण पाकिस्तानसाठी चिंतेचं कारण असणार आहे. पाकिस्तानने हा सामना गमावला तर शेवटचा काहीही जिंकवाच लागणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे.

भारत आणि पाकिस्तान सामना कधी?

वुमन्स आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 5 सप्टेंबरला होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता असेल. तर नाणेफेकीचा कौल हा 7.30 वाजता होईल.

भारत पाकिस्तान सामना कुठे होणार?

वुमन्स आशिया कप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना हा दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

भारत पाकिस्तान सामना कुठे पाहता येईल?

भारत पाकिस्तान सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केलं जाईल.

भारत पाकिस्तान सामना कोणत्या ओटीटीवर?

भारत पाकिस्तान सामन्याचं थेट प्रक्षेपण SonyLIV एप आणि वेबसाईटवर पाहता येईल.

भारत पाकिस्तान हेड टू हेड

भारत आणि पाकिस्तान महिला संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17वेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताची बाजू वरचढ आहे. भारताने 14 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानला फक्त तीन सामन्यात विजय मिळवता आलेला आहे.

दोन्ही संघांचे खेळाडू

भारतीय संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), जी कमलिनी (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, प्रेमा रावत, राधा यादव, श्री चरणी, रेणुका ठाकूर, नंदनी शर्मा, क्रांती गौड, प्रतिका रावल.

पाकिस्तान संघ: फातिमा सना (कर्णधार), आयेशा जफर, इमान नसीर, आयमान फातिमा, गुल फिरोजा, मोमिना रियासत, मुनीबा अली सिद्दीकी (विकेटकीपर), नशरा सुंधू, सदफ शमास, सादिया इक्बाल, सायरा जबीन, शवाल झुल्फिकार, तुबा हसन, उम्म-ए-हानी, वहीद अख्तर.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us