IND vs PAK : तीव्र विरोधामुळे नाही तर या एका कारणामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार?

India Women vs Pakistan Women: आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उभयसंघातील सामना हा रविवारी 5 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना कोणत्या शक्यतेमुळे रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे? जाणून घ्या.

IND vs PAK : तीव्र विरोधामुळे नाही तर या एका कारणामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार?
Harmanpreet Kaur and Fatima Sana IND vs PAK
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 05, 2025 | 12:32 PM

क्रिकेट विश्वात गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची चर्चा पाहायला मिळतेय. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची क्रिकेट चाहत्यांना कायमच प्रतिक्षा असते. मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध खेळू नये, अशी तीव्र भावना भारतीयांची आहे. मात्र केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या परवानगीमुळे मेन्स टीम इंडिया आशिया कप 2025 स्पर्धेत खेळली. टीम इंडियाने या स्पर्धेत पाकिस्तानला अंतिम सामन्यासह एकूण 3 वेळा पराभूत केलं. टीम इंडियाने तिन्ही वेळा या पाकिस्तानच्या खेळाडूंसह हस्तांदोलन टाळलं. त्यानंतर बीसीसीआयने वूमन्स टीम इंडियाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध हँडशेक करु नये,असे आदेश दिल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यानंतर आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान वूमन्स यांच्यातील सामना हा रविवारी 5 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमध्ये होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. मात्र हा सामना रद्द होऊ शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही.

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील सहावा सामना हा रविवारी 5 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्याची क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे. मात्र हा सामना रद्द होऊ शकतो. चाहत्यांना हा सामना रद्द होऊ शकतो याची झलक 4 ऑक्टोबरला श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यातून पाहायला मिळाली. उभयसंघातील या सामन्यात पावसाने खोडा घातला. परिणामी हा सामना रद्द करावा लागला. हा सामना नाणेफेकीशिवाय रद्द करावा लागला. त्यानंतर आता काही तासांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना नियोजित आहे. त्यामुळे हा सामना होणार की नाही? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.

कोलंबोत पावसाची बॅटिंग

कोलंबोत पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. शनिवारी 4 ऑक्टोबरला पावसामुळे श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रद्द करावा लागला. या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे टॉसही होऊ शकला नाही. त्यानंतर आता काही तासांनी भारत-पाकिस्तान सामना नियोजित आहे. या सामन्यावरही पावसाचं सावट आहे. त्यामुळे पावसामुळे हा सामनाही रद्द होणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

एक्युवेदरनुसार, कोलंबोत रविवारी सकाळी जोरदार पावसाचा अंदात वर्तवण्यात आला आहे. कोलंबोत सकाळी 8 ते 10 तसेच 11 ते 12 दरम्यान पाऊस होईल, अशी अंदाज होता. दुपारी 1 नंतर पावसाची शक्यता कमी होत जाईल.