वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत या गोष्टी पहिल्यांदाच घडणार, भारतीय संघ 25 वर्षानंतर करणार असं काम

मेन्स टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या जेतेपदावर भारताने नाव कोरलं आहे. आता वुमन्स संघ पहिल्यांदा जेतेपद मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत भारताची एकदाही वर्ल्डकप जिंकलेला नाही. एकदा संधी चालून आली होती पण ऑस्ट्रेलियाने हिरावून घेतली. असं सर्व असताना या वर्ल्डकपमध्ये काही गोष्टी पहिल्यांदाच घडणार आहेत.

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत या गोष्टी पहिल्यांदाच घडणार, भारतीय संघ 25 वर्षानंतर करणार असं काम
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 6:14 PM

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजलं असून पहिला सामना 3 ऑक्टोबरला होणार आहे. बांग्लादेश विरुद्ध स्कॉटलंड आणि पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना रंगणार आहे. पहिल्याच दिवशी दोन सामन्यांची मेजवाणी क्रीडारसिकांना मिळणार आहे. दोन्ही सामना शारजाहमध्ये होणार आहे. बांग्लादेश स्कॉटलंड सामना दुपारी 3 वाजता, तर पाकिस्तान श्रीलंका सामना संध्याकाळी 7.30 वाजता असणार आहे. दुसरीकडे, भारतीय महिला संघही या स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. स्पर्धेपूर्वीच्या सराव सामन्यात भारताने चमक दाखवली आहे. पहिल्या सराव सामन्यात वेस्ट इंडिजला 20 धावांनी पराभूत केलं. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेला 28 धावांनी मात दिली. आता भारतीय संघ स्पर्धेच्या साखळी फेरीसाठी सज्ज झाला आहे. भारताचा पहिला सामना 4 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्याकडे भारतीय क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दहा संघ सहभागी झाले असून 5-5 चे दोन गट तयार केले आहेत. भारतीय संघ अ गटात असून यात न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आहे. भारतीय संघ साखळी फेरीतील शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी खेळणार आहे. हा सामना शारजाहमध्ये होणार आहे. हे मैदान दोन्ही देशांसाठी खास असणार आहे. कारण या मैदानावर दोन्ही संघ 25 वर्षांपूर्वी भिडले होते. तेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं वादळ घोंगावलं होतं. तेव्हा सचिन तेंडुलकरने 143 धावांची वादळी खेळी केली होती. आता या मैदानावर महिला संघ 25 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाशी सामना करणार आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील बरेचसे सामना दुबईत होणार आहे. यापूर्वी सर्व 10 संघांनी एकदाही दुबईत आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळलेला नाही. म्हणजेच दुबईत पहिल्याच या स्पर्धेचं आयोजन होणार आहे. तसेच या स्पर्धेत होम ग्राउंड असा काही फायदा नसेल. त्यामुळे दोन्ही संघाच्या खेळाडूंची कसोटी लागणार आहे.

दुसरीकडे, आयसीसीने महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी पावलं उचलली आहेत. आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेत महिलांनाही पुरुषांप्रमाणे बक्षिसी रक्कम मिळणार आहे. यापूर्वी बक्षिसाची रक्कम 1 मिलियन डॉलर होती. आता त्यात 134 टक्क्यांची वाढ करून 2.34 मिलियन डॉलर केली आहे.

'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....