AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : दक्षिण आफ्रिकेत महिला टीम इंडियासमोर घडली काळीज हेलावून सोडणारी घटना

भारतीय खेळाडूंच्या नजरेसमोर एक घटना घडली. ज्यामुळे काही मिनिटांसाठी महिला टीममधील खेळाडूंच काळीज हेलावलं, त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. सर्व पाहिल्यानंतर काही क्षणासाठी भारतीय महिला खेळाडूंच्या मनात भिती दाटली.

VIDEO : दक्षिण आफ्रिकेत महिला टीम इंडियासमोर घडली काळीज हेलावून सोडणारी घटना
ind vs wi Image Credit source: twitter
| Updated on: Feb 16, 2023 | 11:21 AM
Share

Womens T20 WC : महिला T20 वर्ल्ड कपमध्ये 15 फेब्रुवारीच्या संध्याकाळी भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये सामना झाला. हा सामना भारतीय महिला टीमने सहज जिंकला. या सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंच्या नजरेसमोर एक घटना घडली. ज्यामुळे काही मिनिटांसाठी महिला टीममधील खेळाडूंच काळीज हेलावलं, त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. भारताची इनिंग सुरु होती. त्यावेळी फिल्डिंग करताना वेस्ट इंडिजची स्टार प्लेयर स्टेफनी टेलर जखमी झाली. तिची हालत खूपच खराब होती. तिला चालताही येत नव्हतं. त्यामुळे मैदानावर स्ट्रेचर आणावी लागली. लाइव्ह मॅचमध्ये हे सर्व पाहिल्यानंतर काही क्षणासाठी भारतीय महिला खेळाडूंच्या मनात भिती दाटली.

कधी मार लागला?

भारतीय इनिंगच्या 8 व्या ओव्हर दरम्यान स्टेफनी टेलरला दुखापत झाली. शॉर्ट फाइन लेगला फिल्डिंग करताना तिला मार लागला. चेंडू थ्रो करताना ही दुखापत झाली. त्यानंतर कॅरेबियाई टीमचा फिजियो लगेच धावत मैदानात आला. स्टेफनी जवळ जाऊन फिजियोने दुखापतीची तीव्रता समजून घेतली. त्यानंतर स्ट्रेचर मागवली.

हेल्थ अपडेट काय?

स्टेफनी टेलरची दुखापत आता कशी आहे, याबद्दल काही ताजी अपडेट नाहीय. ती सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे, एवढच कळतय. स्टेफनी वेस्ट इंडिजची महत्त्वाची आणि अनुभवी सदस्य आहे. तिला टुर्नामेंटच्या पुढच्या सामन्यात खेळता आलं नाही, तर वेस्ट इंडिजच्या आशा संपुष्टात येतील. टीम इंडिया विरुद्ध स्टेफनीचा दमदार खेळ

फिल्डिंग दरम्यान जखमी होण्याआधी स्टेफनी टेलरने भारताविरुद्ध आपलं कौशल्य दाखवलं. तिने 6 चौकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. त्यामुळे वेस्ट इंडिजला 20 ओव्हर्समध्ये 118 धावांपर्यंत पोहोचता आलं. या धावसंख्येचा भारताने सहज पाठलाग केला. कॅरेबियाई टीमने दिलेलं 119 धावांच लक्ष्य टीम इंडियाने 18.1 ओव्हर्समध्ये 4 विकेट गमावून आरामात पार केलं.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.