AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Wi Women World Cup : महिला भारतीय संघाचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये ग्रुप स्टेजमध्ये भारत आणि वेस्ट इंडिमधील सामन्यात महिला भारतीय संघाने सलग दुसरा विजय मिळवला आहे.

Ind vs Wi Women World Cup : महिला भारतीय संघाचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय
| Updated on: Feb 15, 2023 | 11:03 PM
Share

केपटाऊन : आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये ग्रुप स्टेजमध्ये भारत आणि वेस्ट इंडिमधील सामन्यात महिला भारतीय संघाने सलग दुसरा विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजने दिलेल्या 119 धावांचा पाठलाग करताना 6 विकेट्सने मात केली आहे. भारताची युवा खेळाडू रिचा घोषने केलेल्या 32 चेंडूत नाबाद 44 धावांच्या जोरावर दुसरा विजय मिळवत आपली घौडदौड कायम ठेवली आहे. चौथ्या विकेटसाठी कर्णधार हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष यांनी 72 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत विजयाचा पाया रचला.

वेस्ट इंडिजने दिलेल्या आव्हनाचा पाठलाग करताना  भारतीय संघाची खराब सुरूवात झाली. पुनरागन करणाऱ्या स्मृती मंधानाला चमक दाखवता आली नाही. अवघ्या 10 धावा करूनच तंबूत परतली. मागील सामन्यामधील मॅचविनर जेमीमाह रॉड्रिग्सलाही मोठी खेळी करता आली नाही.  त्यानंतर आलेल्या हरमनप्रीत कौर आणि रिचा घोषने खेळपट्टीवर तग धरत लक्ष्याच्या दिशेने वाटचाल केली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजची सुरूवात खराब झाली होती. सामन्याच्या दुसऱ्या षटकातच पुजा वस्त्राकरने कर्णधार हेले मैथ्यूजला बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर आलेल्या शेमेन कैंपबेलने आणि स्टैफनी टेलरने भागादारी केली होती. 14 व्या ओव्हरमध्ये दीप्ती शर्माने जोडी फोडत संघाला यश मिळवून दिलं. दीप्तीने कैंपबेलने 30 धावांवर माघारी पाठवलं.

विजयासाठी भारताला 4 धावांची गरज असताना हरमनप्रीत मोठा फटका मारण्याच्या नादात 33 धावा करत बाद झाली. रिचानेच विजयी चौकार मारत विजयावर शिक्कामोर्तब केलं.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कप्तान), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, देविका वैद्य, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड आणि रेणुका ठाकूर सिंह.

विडिंज प्लेइंग इलेव्हन : हेले मॅथ्यूज (कॅप्टन), स्टॅफनी टेलर, शेमेन कँपबेल, शबिका गजनबी, चिनले हेनरी, चेडियन नेशन, अफी फ्लेचर, शामिलिया कॉनेल, रशादा विलियम्स (विकेटकीपर), करिश्मा रामहरॅक आणि शकीरा सेलमॅन.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.