AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ODI World Cup 2023 : टीम इंडियाच्या मॅनेजमेंट आणि रोहित शर्मा याने परत ‘ती’ चूक केलीच

ODI World CUup 2023 : रोहित शर्मा आणि निवड समितीचे मुख्य अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये घेत रोहित शर्माकडे संघाची घोषणा केली होती. मात्र संघाने परत तीच एक चूक केली आहे, ज्यामुळे त्याचा फटका टीम इंडियाला बसू शकतो.

ODI World Cup 2023 : टीम इंडियाच्या मॅनेजमेंट आणि रोहित शर्मा याने परत 'ती' चूक केलीच
| Updated on: Sep 06, 2023 | 12:55 PM
Share

मुंबई : येत्या महिन्यामध्ये वर्ल्ड कप 2023 च्या थराराला सुरूवात होणार आहे. सर्व सघांनी जोरदार तयारी केली असूम संघांची घोषणाही केलीये. मंगळवारी बीसीसीआयनेही टीम इंडियाची घोषणा केली असून हा संघच अंतिम असेल असं वाटत आहे. आयसीसीच्या नियमानुसार 28 सप्टेंबरपर्यंत सर्वांना आपल्या संघांमध्ये बदल करता येणार आहे. रोहित शर्मा आणि निवड समितीचे मुख्य अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये घेत रोहित शर्माकडे संघाची घोषणा केली होती. मात्र संघाने परत तीच एक चूक केली आहे, ज्यामुळे त्याचा फटका टीम इंडियाला बसू शकतो.

नेमकी कोणती चूक केली?

वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची निवड झाली पण दिग्गज खेळाडूंना संधी मिळाली नाही. यंदाचा वर्ल्ड कप भारतामध्ये असल्याने अनुभवी खेळाडू जे फॉर्ममध्ये असून संघासाठी जो उपयोगी पडेल त्यांना संधी मिळायला हवी होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिग्गज खेळाडू आर. अश्विनची संघात निवड व्हायला पाहिजे होती. आर. अश्विन यशस्वी फिरकीपटूंपैकी एक आहे.

आयपीएल आणि टीम इंडियाकडून खेळताना ऑफ स्पनिर अश्विनने आपल्या फिरकीच्या जोरावर अनेक सामन एकहाती जिंकून घेतले आहेत. कसोटीमध्ये अश्विन भारतीय मैदानावर फलंदाजांसाठी कर्दनकाळच ठरतो. अश्विन समोरच्या फलंदाजांना नकोस करून  सोडतो त्याचा आतापर्यंतचा अनुभव पाहता त्याला संधी मिळायला हवी होती.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलध्येही त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नव्हती.  फायनलमध्ये त्याला संधी न दिल्याने अनेक आजी-माजी खेळाडूंनी निशाणा साधला होता. वर्ल्ड कपमध्ये त्याला संघात जागा द्यायला पाहिजे होती. अनेकांचं म्हणणं असं आहे की मर्यादित ओव्हरच्या फॉरमॅटमध्ये अश्विन तितका इम्पॅक्टफुल नाही. टीमने तिन्ही लेग स्पिनर खेळवण्याचा निर्णय घेतलाय.

वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडियाचा संघ | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उपकर्णधार) , शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.