AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : भारत इंग्लंड सामन्यात हे खेळाडू मिळवून देतील पॉइंट्स, जाणून घ्या स्वप्नपूर्तीचं गणित

World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 29 वा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. तर गतविजेत्या इंग्लंडचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. असं असलं तरी पॉइंट्सच्या गणितात दोन्ही संघातील खेळाडूंचं तितकंच महत्त्व आहे.

IND vs ENG : भारत इंग्लंड सामन्यात हे खेळाडू मिळवून देतील पॉइंट्स, जाणून घ्या स्वप्नपूर्तीचं गणित
IND vs ENG : भारत इंग्लंड सामन्यात हे 11 खेळाडू सोडवतील आर्थिक गणित, कोणते प्लेयर्स लकी ठरतील जे समजून घ्या Image Credit source: Twitter
| Updated on: Oct 28, 2023 | 2:58 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भाताची विजयी घोडदौड सुरुच आहे. पाच पैकी पाच सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने उपांत्य फेरीवर दावा ठोकला. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवताच टीम इंडियाचं उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होणार आहे. तर गतविजेत्या इंग्लंड संघाची स्पर्धेतील स्थिती एकदम वाईट आहे. पाचपैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवण्यात इंग्लंडला यश आलं आहे. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्तानेही इंग्लंडला पराभूत केलं आहे. त्यामुळे या सामन्यावर भारताची पकड मजबूत असेल असं चित्र आहे. स्पर्धेतील आव्हान जर तर वर आलं असलं तरी इंग्लंडचा संघ पुनरागमनासाठी जोरदार प्रयत्न करेल. भारत इंग्लंड हा सामना लखनऊच्या एकाना स्पोर्ट मैदानात होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोणते 11 खेळाडू चमकदार कामगिरी करतील याकडे लक्ष लागून आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 106 वनडे सामने झाले आहेत. त्यात भारताने 57 आणि इंग्लंडने 44 सामन्यात विजय मिळवला आहे. तीन सामने अनिर्णित ठरले आहेत. तर दोन सामने टाय झाले आहेत. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघ 8 वेळा आमनेसामने आले आहेत. यात चार सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे. तर तीन सामन्यात भारताला यश मिळालं आहे. त्याचबरोबर 2011 वर्ल्डकपमध्ये सामना टाय झाला होता.

पिच रिपोर्ट

लखनऊमधील एकाना स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजीसाठी पुरक आहे. मधल्या डावात फिरकीपटूंची जादू पाहायला मिळू शकते. चेंडू बॅटपर्यत हळू येऊ शकतो अशी स्थिती आहे. त्यामुळे 250 ते 270 पर्यंत धावसंख्या होऊ शकते. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल. पॉइंट्सच्या हिशेबाने दोन्ही संघातील खेळाडू महत्त्वाचे ठरतील. पण त्या दिवशी तसंच घडेल असं नाही. मागची आकडेवारी पाहता एक अंदाज बांधला जातो. त्यामुळे काही खेळाडू चांगला पर्याय ठरू शकतात.

ड्रीम इलेव्हन 1

  • विकेटकीपर – जॉनी बेयरस्टो, केएल राहुल
  • बॅटर- रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), जो रूट, शुबमन गिल
  • अष्टपैलू – रविंद्र जडेजा, डेविड विली
  • गोलंदाज- आदिल राशिद, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत संभाव्य प्लेइंग-11 : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

इंग्लंड संभाव्य प्लेइंग-11 : जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार आमि विकेटकीपर), लियाम लिविंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेविड विली, आदिल राशिद, मार्क वुड.

Follow Us
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी... राजकारणातील हालचालींना वेग
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी दिली; आता अभिनेत्री...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्... 'ऑपरेशन टायगर'बाबत मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...; खासदार फुटीनंतर दादा भुसेंचं मोठं विधान
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा पलटवार; म्हणाले, त्यासाठी ठाकरेंना...
बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
Rohit Pawar On Operation Tiger | बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार, महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Sanjay Raut Full Press | 6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार – आता महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकड
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकडून अधिकृत पत्र जारी, काय घडलं?
खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक!
Yawatmal | खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक! संजय देशमुखांचा पुतळा जाळत संताप!