AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS Final : ऑस्ट्रेलियासमोर भारताच्या ‘या’ उणीवा, एक चूक पडू शकते महागात!

वनडे वर्ल्डकप जेतेपदाच्या स्वप्नापासून टीम इंडिया एक विजय दूर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाला तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरण्याची संधी आहे. साखळी फेरी आणि उपांत्य फेरीत टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आहे. आता अंतिम फेरीत हीच अपेक्षा असणार आहे. पण टीम इंडियाच्या काही उणीवांवर ऑस्ट्रेलियाची करडी नजर असणार आहे.

IND vs AUS Final : ऑस्ट्रेलियासमोर भारताच्या 'या' उणीवा, एक चूक पडू शकते महागात!
IND vs AUS Final : ऑस्ट्रेलियाची भारताच्या या चुकांकडे नजर! प्लान यशस्वी झाल्यास कांगारू देतील मात
| Updated on: Nov 18, 2023 | 5:26 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांची सुरुवात पहिल्या लढतीपासून सुरु झाली. त्यानंतर आता अंतिम फेरीत हे दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. साखळी फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाला पराभवाचं पाणी पाजलं होतं. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ तापून सुलाखून निघाला आहे. सुरुवातीच्या दोन पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने जबरदस्त कमबॅक करत सलग 8 सामने जिंकले आणि अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे भारतीय संघाला विजय मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यात भारतीय संघाच्या उणीवांवर कांगारूंची करड नजर आहे. त्यामुळे एक चूक घडली की सामन्यात कमबॅक करणं खूप कठीण होईल. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे स्पर्धेला मुकला आणि टीम इंडियाचं गणित काही अंशी बिघडलं असंच म्हणावं लागेल. पण शमीने भेदक गोलंदाजी करत संघाला मोक्याची क्षणी तारलं. पण सहाव्या क्रमाकांचा फलंदाज हवी तशी कामगिरी करू शकला नाही.

रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा, इशांत किशन आणि श्रेयस अय्यर खातं न खोलता बाद झाले होते. पण त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलने डाव सावरला आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. अंतिम फेरीत हाच कित्ता गिरवला गेला तर सर्वच भार मधल्या फळीच्या फलंदाजांवर येईल. पण त्यात अपयश मिळालं तर सहाव्या क्रमांकावर भरवश्याचं खेळाडू नसल्याचं अधोरेखित झालं आहे.

सूर्यकुमार यादव याला आपली छाप सोडता आली आहे. आक्रमक खेळीमुळे प्रसिद्ध असलेला सूर्यकुमार यादव याला खेळण्याची संधी हवी तशी मिळाली नाही. जेव्हा मिळाली तेव्हा कामगिरी करता आली नाही, असं सर्व गणित आहे. मागच्या सहा सामन्यात सूर्यकुमार यादव 2,49,12,22,2*,1 अशी धावसंख्या करून परतला आहे. त्यामुळे त्याच्यावर मोक्याच्या क्षणी विश्वास ठेवणं म्हणजे कठीणच आहे. रवींद्र जडेजाकडूनही खूप काही अपेक्षा करणं चुकीचं ठरेलं. त्यामुळे टॉप 5 फलंदाजांना मोर्चा सांभाळावा लागणार आहे.

फलंदाजीसोबत गोलंदाजीतही उणीव आहे. फक्त शमीमुळे ती झाकली गेली आहे. भारतीय संघ पाच गोलंदाजांसह मैदानात उतरत आहे. पण न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात सहाव्या गोलंदाजाची उणीव भासली. उपांत्य फेरीत विल्यमसन आणि मिचेलने 181 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला बॅकफूटवर ढकललं होतं. हार्दिक पांड्यामुळे सहावा गोलंदाज शॉर्ट पडत आहे. त्यामुळे पाच गोलंदाजांना जबाबदारीने आपली भूमिका बजवावी लागेल. कारण टीम इंडियाकडे त्या ताकदीचा पार्ट टाईम गोलंदाज नाही.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.