.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 Points Table : बांगलादेशला तर पराभूत केलं पण पाकिस्तान उपांत्य फेरीत जाणार का? जाणून घ्या

World Cup 2023 Points Table : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य फेरीची चुरस रंगतदार वळणावर आहे. भारतीय संघ सोडला तर सात संघांमध्ये चुरस आहे. पण पाकिस्तान उपांत्य फेरी गाठू शकतो का? चला जाणून घेऊयात

World Cup 2023 Points Table : बांगलादेशला तर पराभूत केलं पण पाकिस्तान उपांत्य फेरीत जाणार का? जाणून घ्या
World Cup 2023 Points Table : उपांत्य फेरीत पाकिस्तानी संघ पोहोचू शकतो पण...! समजून घ्या समीकरण Image Credit source: Twitter
| Updated on: Oct 31, 2023 | 11:13 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघांची विजयी घोडदौड सुरु आहे. भारताने अद्याप एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे सहा पैकी सहा सामन्यात विजय मिळवट टीम इंडियाचं उपांत्य फेरीतील स्थान निश्चित आहे. पण सात संघांमध्ये चुरस उपांत्य फेरीसाठी चुरस आहे. इंग्लंड आणि बांगलादेश या स्पर्धेत आता फक्त सामने खेळण्यापुरता उरले आहेत. सातव्या टप्प्यात पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सामना रंगला. हा सामना पाकिस्तानने 7 गडी राखून जिंकला आणि उपांत्य फेरीची आशा कायम ठेवल्या आहेत. गुणतालिकेत पाकिस्तानने पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. पण पाकिस्तानला टॉप 4 संघात स्थान मिळेल का? भारत पाकिस्तान सामना उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीत पाहायला मिळेल का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. चला जाणून घेऊयात पाकिस्तान उपांत्य फेरी कशी गाठू शकतो.

पाकिस्तानचे साखळी फेरीतील फक्त दोन सामने उरले आहेत. सध्या पाकिस्तान 6 गुण आणि -0.024 नेट रनरेटसह पाचव्या स्थानावर आहे. टॉप 4 मध्ये जागा मिळवायची तर दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांचं गणि कोलमडणं गरजेचं आहे. त्यामुळे पाकिस्तानला उर्वरित दोन सामने तर जिंकावेच लागतील. पण दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया पराभूत व्हावे यासाठी नवस करावा लागेल.

संघ सामने विजय पराभव गुणनेट रनरेट
भारत77014+2.102
दक्षिण अफ्रिका76112+2.290
ऑस्ट्रेलिया75210+0.924
न्यूझीलंड8448+0.398
पाकिस्तान8448+0.036
अफगाणिस्तान7438-0.330
श्रीलंका 7254-1.162
नेदरलँड्स7254-1.398
बांगलादेश7162-1.446
इंग्लंड7162-1.504

पाकिस्तानचं उपांत्य फेरीचं समीकरण

  • पाकिस्तानचा पुढचे दोन्ही सामने जिंकावेच लागतील. पहिला सामना न्यूझीलंडशी आहे. 4 नोव्हेंबरला हा सामना होणार आहे. त्यानंतर इंग्लंडसोबत 11 नोव्हेंबरला दुसरा सामना आहे. हे दोन्ही सामने जिंकणं गरजेच आहे. यामुळे पाकिस्तानचे 10 गुण होतील.
  • दक्षिण अफ्रिकेने उर्वरित तिन्ही सामने गमवाले तर 10 गुणच राहतील. अशा वेळी पाकिस्तान चांगल्या नेट रनरेटसह पुढे जाऊ शकतो. मग उर्वरित दोन सामन्यात प्रतिस्पर्धी संघांना मोठ्या फरकाने पराभूत करावं लागेल.
  • न्यूझीलंडचे सध्या 3 सामने उरले आहेत. तीन पैकी तीन सामने गमावले तर पाकिस्तानला सहज संधी मिळेल. पण न्यूझीलंडने एक जरी सामना जिंकला तर मात्र कठीण होईल. तिथे नेट रनरेटचा हिशेब येईल. पण दोन सामने जिंकले तर प्रश्नच येत नाही 12 गुणांसह न्यूझीलंड टॉप 4 मध्ये राहील.
  • ऑस्ट्रेलियाचं गणित देखील न्यूझीलंडसारखंच आहे. एक सामना जिंकला तर क्वॉलिफाय करेल. पण नेट रनरेटचा प्रश्न येईल. पण दोन्ही सामने जिंकले तर मात्र टॉप 4 कायम राहील.
  • पाकिस्तानला अफगाणिस्तानचं देखील टेन्शन आहे. अफगाणिस्तानने तीन मोठे उलटफेर केले आहेत. त्यामुळे उर्वरित तीन सामन्यात चमत्कार केला तर मात्र पाकिस्तानचं काय खरं नाही.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर