AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPAK vs WNEP: पाकिस्तानला आशिया कपमधून बाहेर होण्याचा धोका, नेपाळ ‘आऊट’ करणार?

Womens Pakistan vs Womens Nepal Live Streaming Asia Cup 2024: टीम इंडियाने पाकिस्तानला सलामीच्या सामन्यात पराभूत केलं. त्याामुळे पाकिस्तानसाठी नेपाळ विरुद्धचा सामना हा आरपारचा असा आहे.

WPAK vs WNEP: पाकिस्तानला आशिया कपमधून बाहेर होण्याचा धोका, नेपाळ 'आऊट' करणार?
WPAK vs WNEP
| Updated on: Jul 20, 2024 | 11:54 PM
Share

वूमन्स आशिया कप 2024 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात ए ग्रुपमधील आशियाई संघ आमनेसामने असणार आहेत. पाकिस्तान विरुद्ध नेपाळ असा हा सामना होणार आहे. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील दुसरा सामाना असणार आहे. पाकिस्तानला सलामीच्या सामन्यात टीम इंडियाने लोळवलं. तर दुसऱ्या बाजूला नेपाळने यूएईवर मात करत आशिया कप स्पर्धेतील पहिलावहिला विजय मिळवला. त्यामुळे आता नेपाळकडे पाकिस्तानला धुळ चारत पुढील फेरीसाठी आपली दावेदारी आणखी मजबूत करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानसमोर स्पर्धेतील आव्हान कायम राखायचं असेल, तर नेपाळ विरुद्ध जिंकावंच लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी नेपाळ विरुद्धचा सामना हा ‘करो या मरो’ असा आहे. निदा दार ही पाकिस्तानची कॅप्टन्सी करणार आहे. तर इंदू बर्मा हीच्याकडे नेपाळच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

पाकिस्तान विरुद्ध नेपाळ सामना केव्हा?

पाकिस्तान विरुद्ध नेपाळ सामना रविवारी 21 जुलै रोजी होणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध नेपाळ सामना कुठे?

पाकिस्तान विरुद्ध नेपाळ सामना रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे खेळवण्यात येणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध नेपाळ सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

पाकिस्तान विरुद्ध नेपाळ सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

पाकिस्तान विरुद्ध नेपाळ सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

पाकिस्तान विरुद्ध नेपाळ सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

पाकिस्तान विरुद्ध नेपाळ सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

पाकिस्तान विरुद्ध नेपाळ सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर मोफत पाहायला मिळेल.

पाकिस्तान वूमन्स टीम: निदा दार (कॅप्टन), गुल फिरोजा, मुनीबा अली (विकेटकीपर), सिद्रा अमीन, आलिया रियाझ, तुबा हसन, इरम जावेद, फातिमा सना, सय्यदा आरूब शाह, नशरा संधू, सादिया इक्बाल, डायना बेग, ओमामा सोहेल, नजीहा अल्वी आणि तस्मिया रुबाब.

नेपाळ वूमन्स टीम: इंदू बर्मा (कर्णधार), समझ खडका, सीता राणा मगर, कविता कुंवर, रुबिना छेत्री, पूजा महतो, बिंदू रावल, काजल श्रेष्ठ (विकेटकीपर), कविता जोशी, कृतिका मरासिनी, सबनम राय, डॉली भट्टा, रोमा थापा, ममता चौधरी आणि राजमती आयरी.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.