WPL 2023, MIW vs UPW | नॅट सायव्हर ब्रंट हीचा तडाखा, मुंबईकडून यूपीला विजयासाठी 183 धावांचं आव्हान

मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्जला विजयासाठी 183 धावांचे आव्हान दिलं आहे. आता हा सामना जिंकणारी टीम अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध भिडणार आहे.

WPL 2023, MIW vs UPW | नॅट सायव्हर ब्रंट हीचा तडाखा,  मुंबईकडून यूपीला विजयासाठी 183 धावांचं आव्हान
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 9:47 PM

मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील एलिमिनेटर सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्जला विजयासाठी 183 धावांचे आव्हान दिले आहे. मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 182 धावा केल्या. मुंबईकडून नॅट सायव्हर-ब्रंट हीने सर्वाधिक 72 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. नॅट सायव्हर-ब्रंट व्यतिरिक्त मुंबईच्या इतर फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यांना त्या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करण्यात अपयश आलं.

मुंबईकडून सलामीवीर यास्तिका भाटिया हीने 21 धावांचं योगदान दिलं. हॅली मॅथ्यूज हीने 26 रन्स केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर 14 रन्स करुन माघारी परतली. मेली केर हीने 29 रन्स केल्या तर पूजा वस्त्राकर 11 धावांवर नाबाद राहिली. यूपीकडून सोफी एक्लेस्टोन हीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर अंजली सर्वनी आणि पार्श्वी चोपरा या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

नॅट सायव्हर-ब्रंट हीचा तडाखा

नॅट हीने फक्त 38 बॉलमध्ये 72 धावांची खेळी केली. नॅट हीने 189.47 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. नॅट हीने या खेळीत 9 चौकार आणि 2 खणखणीत षटकार खेचले. नॅटने अर्धशतक ठोकल्यानंतर आक्रमकपणे फटकेबाजी केली. नॅटने केलेल्या या वादळी खेळीमुळे मुंबईला 180 पार मजल मारता आली. तसेच यूपीला 183 धावांचं आव्हान देता आलं.

हे सुद्धा वाचा

फायनलमध्ये कोण पोहचणार?

दरम्यान या स्पर्धेत मुंबई विरुद्ध यूपी हो दोन्ही संघ एकूण 2 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये 12 मार्चला झालेल्या सामन्यात मुंबईने यूपीवर विजय मिळवला होता. तर त्यानंतर 18 मार्चला झालेल्या मॅचमध्ये यूपीने मुंबईवर मात करत पराभवाचा वचपा घेतला होता. त्यामुळे हे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. यामुळे आता या स्पर्धेत उभयसंघांची ही तिसरी वेळ आहे. यामुळे हा तिसरा सामना जिंकून अंतिम फेरीत कोण धडक मारणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वाँग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता आणि सायका इशाक.

यूपी वॉरियर्स | अलिसा हिली (विकेटकीपर आणि कॅप्टन), श्वेता सेहरावत, सिमरन शेख, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवाणी, पार्श्वी चोप्रा आणि राजेश्वरी गायकवाड.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.