AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sania Mirza ची IPL मध्ये एंट्री, RCB ला चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी

. सानिया मिर्झा क्रिकेटच्या मैदानात काय करणार?. सानिया मिर्झा क्रिकेट खेळणार नसली, तरी तिच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. सानिया मिर्झा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी काम करणार आहे.

Sania Mirza ची IPL मध्ये एंट्री, RCB ला चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी
Sania-MirzaImage Credit source: instagram
| Updated on: Feb 15, 2023 | 11:45 AM
Share

Sania mirza in RCB : भारताची स्टार टेनिसटपूट सानिया मिर्झा लवकरच आपल्याला क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. तुम्ही म्हणाल टेनिस आणि क्रिकेटचा काय संबंध?. सानिया मिर्झा क्रिकेटच्या मैदानात काय करणार?. सानिया मिर्झा क्रिकेट खेळणार नसली, तरी तिच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. सानिया मिर्झा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी काम करणार आहे. लवकरच आयपीएलच्या धर्तीवर वुमन्स प्रीमियर लीग टुर्नामेंट सुरु होणार आहे. या टुर्नामेंटमध्ये RCB ची महिला टीम सुद्धा आहे. सानिया RCB च्या महिला टीमची मेंटॉर म्हणजे मार्गदर्शक आहे. RCB ने त्यांच्या अधिकृत टि्वटर अकाऊंटवरुन ही माहिती दिलीय.

RCB ने टि्वटमध्ये काय म्हटलय?

“सानिया मिर्झा भारतीय क्रीडा क्षेत्रात महिलांसाठी एक आदर्श आहे. तिने तिच्या करिअरमध्ये एक ठरलेली चौकट मोडली. इतरांसाठी आदर्शवत ठरेल असं काम केलं. मैदानावर आणि मैदानाबाहेर ती चॅम्पियन आहे. RCB च्या महिला क्रिकेट टीमसाठी मार्गदर्शक म्हणून सानियाच नाव जाहीर करताना आम्हाला अभिमान वाटतोय” असं आरसीबीने म्हटलय.

सानिया काय शिकवणार?

“मला थोडं आश्चर्य वाटलं. पण मी उत्साहित आहे. मी मागच्या 20 वर्षांपासून व्यावसायिक खेळाडू आहे. क्रीडा क्षेत्रात सुद्धा तुम्ही करिअर घडवू शकता हा विश्वास तरुण महिला, मुलींमध्ये निर्माण करण्याची माझी पुढची जबाबदारी आहे” असं सानिया नियुक्तीनंतर म्हणाली. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी तू काय करणार? या प्रश्नावर, कुठल्याही खेळामध्ये दबाव कसा हाताळायचा ते महत्त्वाच असतं. मानसिक दृष्ट्या खेळाडूंना कणखर बनवण्यावर काम करणार असल्याचं तिने सांगितलं.

तोच खरा चॅम्पियन

“क्रिकेट आणि टेनिसच्या खेळात बऱ्याच बाबतीत समानता आहे. प्रत्येक खेळाडू बऱ्याचदा सारखा विचार करतो. त्यांना सारखाच दबाव हाताळावा लागतो. दबावाची स्थिती हाताळणं, महत्त्वाच असतं. जे दबाव उत्तमपणे हाताळतात, ते सर्वात मोठे चॅम्पियन ठरतात” असं सानिया मिर्झा म्हणाली. RCB च्या टीममध्ये या स्टार खेळाडू

13 फेब्रुवारीला WPL साठी ऑक्शन पार पडलं. स्मृती मांधनला आरसीबीने विकत घेतलं. तिच्यासाठी 3.40 कोटी रुपयांची ऐतिहासिक बोली लावली. एलिस पेरी, सोफी डिवाइन, रेणुका सिंह आणि रिचा घोष हे स्टार खेळाडू या टीममध्ये आहेत.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.