AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs UPW, Video : दीप्ती शर्मा आणि स्मृती मंधानामध्ये तू तू मैं मैं, चेंडू टाकताना जसं केलं तसंच उत्तर दिलं

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने युपी वॉरियर्स विजयासाठी 199 धावांचं आव्हान दिलं आहे. युपी वॉरियर्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्याशिवाय पर्याय नव्हता. स्मृती मंधानाने आक्रमकपणे फलंदाजी केली. यावेळी दीप्ती शर्मा आणि स्मृती मंधाना यांच्यात तू तू मैं मैं पाहायला मिळाली.

RCB vs UPW, Video : दीप्ती शर्मा आणि स्मृती मंधानामध्ये तू तू मैं मैं, चेंडू टाकताना जसं केलं तसंच उत्तर दिलं
RCB vs UPW, Video : स्मृती मंधानाला फलंदाजी करताना दीप्ती शर्माने फसवलं, मग काय तसाच घेतला बदला
| Updated on: Mar 04, 2024 | 10:05 PM
Share

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 11व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि युपी वॉरियर्स आमनेसामने आले. या सामन्यातील विजय दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौलही तितकाच महत्त्वाचा आहे. आतापर्यंत झालेल्या सर्वच सामन्यांमध्ये नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी घेण्याचा ट्रेंड आहे. त्याला दव फॅक्टर हे कारणीभूत आहे. त्यामुळे नाणफेकीचा कौल आपल्या बाजूने लागला की लागला प्रथम गोलंदाजी स्वीकारली जात आहे. या सामन्यात युपी वॉरियर्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. त्यामुळे बंगळुरुला काही करून धावांचा डोंगर उभा करणं गरजेचं होतं. कारण 150 च्या आसपास धावा आरामात चेस होताना पाहिलं गेलं आहे. हाच अंदाज बांधून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या फलंदाजानी आक्रमक पवित्रा घेतला. सब्भनेनी मेघना आणि स्मृती मंधाना यांनी पहिल्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्मृती मंधाना आणि एलिसा पेरी यांच्यात 95 धावांची पार्टनरशिप झाली. त्यानंतर एलिसा पेरी आणि रिचा घोष यांनी 42 धावांची भागीदारी केली. स्मृती मंधानाने आक्रमकपणे 50 चेंडूत 80 धावा केल्या. यात 10 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. आक्रमक शैली पाहून युपी वॉरियर्सचे गोलंदाज मेटाकुटीला आले होते. दीप्ती शर्मा गोलंदाजी करत असताना त्याचा परिणाम दिसून आला.

युपी वॉरियर्सने 11 वं षटक दीप्ती शर्माकडे सोपवलं. तेव्हा स्मृती मंधानाने 28 चेंडूत 40 धावांची खेळी केली होती. पहिल्या चेंडूवर स्मृतीने एक धाव घेतली. दुसऱ्या चेंडू पेरीला निर्धाव टाकण्यात यश आलं. तिसऱ्या चेंडूवर पेरीने एक धाव घेतली आणि पुन्हा स्मृतीला स्ट्राईक दिली. चौथ्या चेंडूवर दीप्ती आणि स्मृतीमध्ये तू तू मै मै पाहायला मिळाली. दीप्ती गोलंदाजी आली पण एक्शन करून चेंडू टाकलाच नाही. त्याला स्मृतीनेही जशास तसं उत्तर दिलं. परत चेंडू टाकायला आली तेव्हा बाजूला झाली. हा प्रसंग पाहून बंगळुरुच्या डगआऊटमध्ये हास्यकल्लोळ झाला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, एकता बिश्त, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग

यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): ॲलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), किरण नवगिरे, चमारी अथापथू, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, दीप्ती शर्मा, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, राजेश्वरी गायकवाड, सायमा ठाकोर, अंजली सरवानी

Follow Us
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय