WPL 2025 MI vs RCB : मुंबई इंडियन्सने आरसीबीला 4 गडी राखून केलं पराभूत
वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात अटीतटीचा सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने या सामन्यात 4 गडी राखून पराभव केला. आरसीबीने विजयासाठी 168 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान मुंबईने 6 गडी गमवून पूर्ण केलं.

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या सातव्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 7 गडी गमवून 167 धावा केल्या. तसेच विजयासाठी 168 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सला विजयासाठी चांगलच झुंजवलं. मुंबई इंडियन्सने शेवटच्या षटकात विजय मिळवला. अमनजोत कौर आणि जी कमालिनी शेवटच्या षटकात विजय मिळवून दिला. 19 षटाकात मुंबई इंडियन्सला 12 चेंडूत 22 धावांची आवश्यकता होती. त्यामुळे सामना हातून निसटतो की काय असं वाटत होतो. या षटकात अमनजोत कौरने दोन षटकार मारत सामना मुंबईच्या पारड्यात झुकला आहे. या षटकात एकूण 16 धावा केल्या.
मुंबईला विजयासाठी शेवटच्या षटकात 6 धावांची गरज होती. पहिला चेंडू निर्धाव गेला. दुसऱ्या चेंडूवर जी कमालिनीने दोन धावा घेतल्या. तिसर्या चेंडूवर 1 धाव घेऊन अमनजोतला स्ट्राईक दिली. त्यानंतर अमनजोतने पुन्हा एक धाव घेतली आणि कमालिनीला स्ट्राईक दिली. दोन चेंडूत 2 धावांची गरज असताना कमालिनीने चौकार मारला आणि सामना जिंकला. या विजयासह मुंबईने या स्पर्धेत दुसरा विजय मिळवला आहे. तर बंगळुरुचा सलग तिसरा सामना जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे.
मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने चांगली खेळी करत एक बाजू सावरली. तिला नॅट स्कायव्हर ब्रंटची साथ लाभली. हरमनप्रीतने 38 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार मारत 50 धावा केल्या, तर नॅटने 21 चेंडूत 9 चौकाराच्या मदतीने 42 धावा केल्या.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना (कर्णधार), डॅनियल व्याट-हॉज, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), रघवी बिस्ट, कनिका आहुजा, जॉर्जिया वेरेहम, किम गर्थ, एकता बिश्त, जोशिता व्हीजे, रेणुका सिंग ठाकूर.
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, सजीवन सजना, जी कमलिनी, अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, पारुनिका सिसोदिया
