WPL 2025, DC vs GG : दिल्ली कॅपिटल्सचं गुजरातसमोर 178 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने २० षटकात ५ गडी गमवून १७५ धावा केल्या आणि विजयासाठी १७६ धावांचं आव्हान दिलं.

वुमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या १७व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गुजरात जायंट्सच्या बाजूने लागला आणि स्पर्धेत सुरु असलेल्या ट्रेंडप्रमाणे प्रथम गोलंदाजी घेतली. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ गडी गमवून १७७ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सला विजयासाठी १७८ धावा दिल्या आहेत. आता हे आव्हान गुजरात जायंट्स गाठणार की नाही? हे पाहणं औत्सुक्याचं आहे. मेघना सिंगने या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली. ४ षटकात ३५ धावा देत ३ विकेट घेतल्या. तर डिएंड्रा डॉटीनने ४ षटकात ३७ धावा देत २ विकेट घेतल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून मेग लेनिंगने सर्वाधिक धावा केल्याय कर्णधारपदाला साजेशी कामगिरी तिने केली. तिने ५७ चेंडूत ९२ धावा केल्या. मेग लेनिंगने १५ चौकार आणि १ षटकार मारला. तर शफाली वर्माने २७ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४० धावा केल्या.
मेघना सिंग म्हणाली की, ‘खूप छान वाटतंय, मी बऱ्याच दिवसांपासून विकेट्समध्ये येण्याची वाट पाहत होते आणि आज मी काही विकेट्स घेण्यास यशस्वी झालो. मी नेहमीच संघाच्या परिस्थितीनुसार गोलंदाजी करते. खेळपट्टी खरोखरच चांगली आहे.तुम्ही जितका वेग घ्याल तितके गोलंदाजांसाठी चांगले होईल. मी या भूमिकेसाठी खूप दिवसांपासून तयारी करत आहे आणि नेहमीच माझे सर्वोत्तम देऊ इच्छिते. विकेट सर्वोत्तम असते आणि जर आपण सरळ खेळलो आणि चेंडूच्या गुणवत्तेनुसार फलंदाजी केली तर ते निश्चितच शक्य आहे.’
दोन्ही संघांची प्लेइंग 11
गुजरात जायंट्स महिला (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (विकेटकीपर), दयालन हेमलता, हरलीन देओल, एशले गार्डनर (कर्णधार), डिआंड्रा डॉटिन, फोबी लिचफिल्ड, भारती फुलमाली, काशवी गौतम, मेघना सिंग, तनुजा कंवर, प्रिया मिश्रा.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लेनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, अॅनाबेल सदरलँड, मॅरिझाने कॅप, जेस जोनासेन, सारा ब्राइस (विकेटकीपर), निकी प्रसाद, मिन्नू मणी, शिखा पांडे, तितास साधू.
