AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2025 DC vs GG : गुजरात जायंट्सने दिल्ली कॅपिटल्ससला 5 गडी राखून केलं पराभूत, मेग लेनिंगची खेळी व्यर्थ

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचा 17वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात रंगला. दिल्ली कॅपिटल्सचा साखळी फेरीतील हा शेवटचा सामना होता. गुजरातने दिल्लीला पराभूत गुणतालिकेत आपलं स्थान कायम ठेवलं आहे. आता गुजरात जायंट्स सुपर 3 मध्ये पात्र ठरते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

WPL 2025 DC vs GG :  गुजरात जायंट्सने दिल्ली कॅपिटल्ससला 5 गडी राखून केलं पराभूत, मेग लेनिंगची खेळी व्यर्थ
Image Credit source: Gujrat Giants Twitter
| Updated on: Mar 07, 2025 | 11:00 PM
Share

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील 17 सामन्यात गुजरात जायंट्सला पराभवाला सामोरं जावं लागलं. नाणेफेकीचा कौल गुजरात जायंट्सच्या बाजूने लागला त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजी करावी लागली. दिल्ली कॅपिटल्सला दुसऱ्या डावात विजय मिळवायचा असेल तर धावा अधिक असणं गरजेचं आहे याचं भान होतं. त्यामुळेच मेग लेनिंग आणि शफाली वर्मा यांनी आक्रमक सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी मिळून 83 धावांची भागीदारी केली. 27 चेंडूत 40 धावा करून शफाली वर्मा बाद झाली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची पडझड सुरु झाली. जोनासेन आणि जेमिमा रॉड्रिक्स स्वस्तात बाद झाले. त्यानंतर आलेली अनाबेल सदरलँडही काही खास करू शकली नाही. दुसऱ्या बाजूने मेग लेनिंगने आक्रमक पवित्रा कायम ठेवला होता. तिने 57 चेंडूत 15 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 92 धावांची खेळी केली. पण शतक अवघ्या 8 धावांनी हुकलं. त्यामुळे वुमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वातही शतकी खेळी पाहता आली नाही. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 5 गडी गमवून 177 धावा केल्या आणि विजयासाठी 178 धावांचं आव्हान दिलं.

विजयासाठी दिलेलं आव्हान गाठताना गुजरात टायटन्सची चांगली कोंडी झाली. शेवटच्या दोन षटकात झटपट दोन विकेट पडल्याने दडपण वाढलं. कधी सामना या पारड्यात तर कधी त्या पारड्यात झुकत होता. त्यामुळे प्रेक्षकही मैदानात अस्वस्थ होत होते. गुजरात जायंट्सच्या हरलीन देओलने एका बाजूने खिंड लढवणं सुरुच ठेवलं होतं. त्यात कशवी गौतमने षटकार मारून डोक्यावरचं टेन्शन कमी केलं. त्यामुळे शेवटच्या 7 धावांची गरज गुजरातला होती.  या धावा 3 चेंडू राखून केल्या आणि गुजरात जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सवर 5 गडी राखून विजय मिळवला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

गुजरात जायंट्स महिला (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (विकेटकीपर), दयालन हेमलता, हरलीन देओल, एशले गार्डनर (कर्णधार), डिआंड्रा डॉटिन, फोबी लिचफिल्ड, भारती फुलमाली, काशवी गौतम, मेघना सिंग, तनुजा कंवर, प्रिया मिश्रा.

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लेनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, अ‍ॅनाबेल सदरलँड, मॅरिझाने कॅप, जेस जोनासेन, सारा ब्राइस (विकेटकीपर), निकी प्रसाद, मिन्नू मणी, शिखा पांडे, तितास साधू.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.