DC vs GG, WPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सला अंतिम फेरी गाठण्याची संधी, नाणेफेकीचा कौल होताच गुजरातने घेतला असा निर्णय
प्लेऑफसाठी आधीच पात्र ठरलेली दिल्ली कॅपिटल्स आपला शेवटचा साखळी फेरीतील सामना गुजरात जायंट्सविरुद्ध खेळणार आहे. थेट अंतिम फेरी गाठण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला हा सामना जिंकणं भाग आहे. तर गुजरात जायंट्सने हा सामना गमावला तर स्पर्धेतील आव्हान डळमळीत होऊ शकतं.

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील 17वा सामना हा दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात होत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा हा शेवटचा साखळी फेरीतील सामना आहे. यापूर्वी दिल्लीने सुपर 3 मध्ये प्रवेश केला आहे. मात्र टॉपचं स्थान चांगल्या रनरेटसह अबाधित ठेवण्याचं आव्हान आहे. जर तसं करण्यात दिल्ली कॅपिटल्सला यश आलं तर थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळणार आहे. दुसरीकडे, गुजरात जायंट्सने हा सामना गमावला तर टॉप 3 मधील स्थान डळमळीत होणार आहे. काहीही करून शेवटचा सामना तर जिंकावाच लागेल. तसेच आरसीबीच्या कामगिरीकडे लक्ष ठेवावं लागणार आहे. आरसीबी आणि गुजरात जायंट्सचा साखळी फेरीतील शेवटचा सामना मुंबई इंडियन्ससोबत होणार आहे. साखळी फेरीत दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना पार पडला आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्ने 6 विकेट आणि 29 चेंडू राखून जिंकला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागून आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल गुजरात जायंट्सच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे.
गुजरात जायंट्सची कर्णधार एशले गार्डनर म्हणाली, आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. काल रात्री चांगली खेळपट्टी होती, आमच्या गोलंदाजांनी धावांचा प्रवाह रोखला आहे आणि आशा आहे की आम्ही आजही ते करू शकू. गेल्या वेळी थोडे दव पडले होते आणि आशा आहे की नंतर फलंदाजी सोपी होईल. हे एक आव्हान होते पण काही आंतरराष्ट्रीय अनुभव आणि खेळाडूंमुळे मदत झाली आहे. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे लोक उभे राहिले आहेत परंतु सर्वात रोमांचक गोष्ट म्हणजे आमचे गोलंदाज; मग ते काशवी असोत किंवा मोना.
दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने सांगितलं की, ‘मला वाटतं की ही एक चांगली फलंदाजीची खेळपट्टी आहे. तुम्ही आधी काय करता हे महत्त्वाचे नाही जोपर्यंत तुम्ही ते चांगले करत नाही. गरज पडल्यास स्विच ऑन आणि ऑफ करण्यात संघाने चांगली कामगिरी केली आहे. आमच्याकडे एक बदल आहे. लीगमधील बहुतेक सलामी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे.’
दोन्ही संघांची प्लेइंग 11
गुजरात जायंट्स महिला (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (विकेटकीपर), दयालन हेमलता, हरलीन देओल, एशले गार्डनर (कर्णधार), डिआंड्रा डॉटिन, फोबी लिचफिल्ड, भारती फुलमाली, काशवी गौतम, मेघना सिंग, तनुजा कंवर, प्रिया मिश्रा.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लेनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, अॅनाबेल सदरलँड, मॅरिझाने कॅप, जेस जोनासेन, सारा ब्राइस (विकेटकीपर), निकी प्रसाद, मिन्नू मणी, शिखा पांडे, तितास साधू.
