WPL 2026 : तीन संघाचं भवितव्य दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध यूपी वॉरियर्स सामना ठरवणार, कसं ते जाणून घ्या

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतील साखळी फेरीतील चुरस शेवटच्या सामन्यापर्यंत वाढली आहे. या स्पर्धेतील अंतिम फेरीत आरसीबीने धडक मारली आहे. तर एलिमिनेटरमध्ये गुजरात जायंट्सने धडक मारली आहे. त्यामुळे अजून एका संघासाठी तीन संघात चुरस आहे.

WPL 2026 : तीन संघाचं भवितव्य दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध यूपी वॉरियर्स सामना ठरवणार, कसं ते जाणून घ्या
तीन संघाचं भवितव्य दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध यूपी वॉरियर्स सामना ठरवणार, कसं ते जाणून घ्या
Image Credit source: WPL/BCCI
| Updated on: Jan 31, 2026 | 7:00 PM

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात होणार आहे. या सामन्यावर तीन संघांचं एलिमिनेटर फेरीचं गणित ठरणार आहे. या जागेसाठी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांचं भवितव्य अवलंबून आहे. गुजरात जायंट्सकडून पराभव पत्करावा लागला असला तरी, मुंबई इंडियन्स अजूनही शर्यतीत आहे.कारण गुणतालिकेतील स्थिती पाहता काहीही होऊ शकतं असं दिसत आहे. गुण आणि नेट रनरेटच्या आधारावर पुढच्या फेरीचं गणित सुटणार असल्याचं दिसत आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या खात्यात प्रत्येकी 6 गुण आहेत. पण मुंबई इंडियन्सचा नेट रनरेट हा दिल्लीपेक्षा चांगला आहे. त्यामुळे जर तरच्या शक्यता पाहता काहीही होऊ शकतं.

… तर मुंबई इंडियन्सला संधी

दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या सामन्यात यूपी वॉरियर्सचा पराभव केला तर थेट एलिमिनेटर फेरीत स्थान मिळेल. पण या सामन्यात पराभव झाला तर मुंबई इंडियन्सला एलिमिनेटर फेरीचं दारं खुली होतील. कारण यूपी वॉरियर्सने हा सामना जिंकला तर तिन्ही संघांचे प्रत्येकी सहा गुण होतील. त्यामुळे पुढच्या फेरीचं गणित हे नेट रनरेटच्या आधारावर सोडवलं जाईल. या तिघांमध्ये मुंबई इंडियन्सचा नेट रनरेट हा सर्वात चांगला आहे. त्यामुळे यूपी वॉरियर्सने सामना जिंकला तर मुंबई इंडियन्स अधिक संधी मिळू शकते.

… तर यूपी वॉरियर्सला संधी

यूपी वॉरियर्सच्या एलिमिनेटर फेरीच्या आशा अजूनही जिवंत आहेत. पण अभिषेक नय्यर प्रशिक्षक असलेल्या संघाला प्रथम फलंदाजी केल्यास सुमारे 156 धावांनी (स्कोअरवर अवलंबून) विजय मिळवावा लागेल. प्रथम गोलंदाजी केली तर त्यांना दोन षटकांपेक्षा कमी चेंडूत धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. तसं पाहिलं तर हे गणित खूपच कठीण आहे. त्यामुळे यूपी वॉरियर्स जिंकणं हे मुंबई इंडियन्सच्या पथ्यावर पडेल.

… तर दिल्ली कॅपिटल्सला संधी

दिल्ली कॅपिटल्सने शेवटचा सामना जिंकला की थेट एलिमिनेटरमध्ये गुजरात जायंट्सविरुद्ध खेळेल. पण पराभव झाला तर नेट रनरेट खूपच महत्त्वाचा असणार आहे. मुंबई इंडियन्सचा नेट रनरेट हा +0.059 इतका आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा नेट रनरेट हा -0.164 इतका आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा पराभव झाला तरी हा नेट रनरेट सुधारणं खूपच महत्त्वाचं आहे. पण पराभव झाला तर नेट रनरेट काही अधिक होणार नाही. त्यामुळे जिंकल्याशिवाय पर्यायच नाही. एखाद वेळा हा सामना काही कारणास्तव ड्रॉ झाला तर मात्र एक गुण मिळेल. त्यामुळे पुढच्या फेरीचं तिकीट मिळू शकते.