Womens World Cup 2025 Final: पहिल्या वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिका-इंडियात रस्सीखेच, दोघांपैकी वरचढ कोण? पाहा आकडे
India vs South Africa Womens Final Explainer : महिला क्रिकेटच्या इतिहासात यंदा नवा विश्व विजेता मिळणार आहे. आतापर्यंत फक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड याच 3 संघांनी वर्ल्ड कप जिंकला आहे. मात्र आता फायनलमध्ये यजमान भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. त्यामुळे वर्ल्ड कप जिंकणारा चौथा संघ कोण ठरणार? याची उत्सूकता शिगेला पोहचली आहे.

आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामना हा रविवारी 2 नोव्हेंबरला नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. महामुकाबल्यात यजमान टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघ वर्ल्ड कप ट्रॉफीपासून फक्त 1 पाऊल दूर आहेत. मात्र दोघांपैकी कोणत्या एका संघाचं विश्व विजेता होण्याचं स्वप्न पूर्ण होईल. तर एका संघाला उपविजेता म्हणून समाधान मानावं लागेल. दोन्ही संघांनी आतापर्यंत या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. तर अंतिम सामन्याआधी दोन्ही संघांनी जोरदार सराव केला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत कशी कामगिरी केलीय? तसेच दोघांपैकी कोण वरचढ आहे? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. ...
